Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

सोलापूर महानगरपालिकेत शिवसेना भाजप युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाल्यानंतर आता शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील युतीच्या हालचालींना वेग आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 28, 2025 | 06:52 PM

Follow Us

सोलापूर महानगरपालिकेत शिवसेना भाजप युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाल्यानंतर आता शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील युतीच्या हालचालींना वेग आला आहे. सोलापुरातील एका नामांकित हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक सुरू असून, महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपावर प्राथमिक एकमत झाले आहे.सोलापूर महानगरपालिकेतील एकूण १०२ जागांपैकी ५० टक्के जागांवर दोन्ही पक्षांनी समान वाटा घेण्यावर सहमती दर्शविले आहे. त्यानुसार शिवसेना (शिंदे गट) ५१ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५१ जागांवर निवडणूक लढवणार, अशा फॉर्म्युल्यावर चर्चा सकारात्मक झाली. या बैठकीदरम्यान दोन्ही पक्षांनी महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी संयुक्तपणे रणनीती आखण्यावर भर दिला. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, प्रभागनिहाय ताकद, तसेच उमेदवार निवडीबाबत सविस्तर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.या विषयावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री व शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी युतीबाबत सकारात्मक संकेत दिले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सोलापूरच्या विकासासाठी सक्षम व स्थिर महापालिका आवश्यक असल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दोन्ही पक्षांमध्ये चर्चा योग्य दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट केले.शिवसेना राष्ट्रवादी युती अंतिम झाल्यास सोलापूर महानगरपालिकेच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता असून, आगामी निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Close

Follow Us:

Web Title: Shivsena ncp mahayuti preliminary consensus on 5050 formula for 102 seats in municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 06:52 PM

Topics:  

  • Marathi News
  • Solapur News

संबंधित बातम्या

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ
1

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग
2

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर
3

Devgadh News: एका तलाठ्यावर १० गावांचा डोंगर! देवगड महसूल प्रशासनाचा कारभार ‘रामभरोसे’
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.