कल्याणमधील इमारत दुर्घटनेनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना काही खासगी रुग्णालयांनी उपचारासाठी नकार दिला, असा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला आहे. त्यांनी केडीएमसी आयुक्तांकडे निवेदन देत संबंधित रुग्णालयांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा निष्काळजीपणामुळे आणखी जीवितहानी होण्याची शक्यता होती, असेही पोटे यांनी म्हटले आहे.