Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Election : ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर

प्रभाग क्रमांक ३ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी महिलांसाठी खास जाहीरनामा सादर करत प्रचारात ठळक वेगळेपण निर्माण केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 11, 2026 | 01:00 PM
ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर

ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर

Follow Us
Close
Follow Us:
  • ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा
  • 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर
  • पूर्व पुण्यातील महिलांसाठी नवी दिशा
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या असून, शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचार शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी महिलांसाठी खास जाहीरनामा सादर करत प्रचारात ठळक वेगळेपण निर्माण केले आहे.

महिला आरोग्य, महिला सुरक्षितता, महिला कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरण या चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित हा जाहीरनामा असून, विशेषतः लोहगाव आणि वाघोली परिसरातील महिलांच्या दैनंदिन समस्या आणि गरजा लक्षात घेऊन तो तयार करण्यात आला आहे. निवडून आल्यानंतर या चारही विषयांवर प्राधान्याने काम केले जाईल, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

जाहीरनामा केवळ घोषणापुरता नाही

फक्त कागदावर जाहीरनामा जाहीर करून थांबायचे नाही, तर वाघोली आणि लोहगाव परिसरातील प्रत्येक घरापर्यंत जाऊन या योजनांची अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या आरोग्यासाठी मूलभूत सुविधा, सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना, कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि आर्थिक-सामाजिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

प्रचारात भाजपची आघाडी कायम

प्रभाग क्रमांक ३ मध्ये सुरुवातीपासूनच भाजपचा प्रचार प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. उच्चशिक्षित आणि आयटी क्षेत्रातील अनुभव असलेल्या ऐश्वर्या पठारे यांनी आपल्या वेगळ्या विचारसरणीमुळे प्रचारात लक्ष वेधून घेतले आहे. “नगरसेवक म्हणून नव्हे, तर प्रभागाची प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणार,” अशी भूमिका त्यांनी आधीच मांडली होती.

‘100 दिवस 100 कामे’ संकल्पनेवर भर

प्रचारादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘100 दिवस 100 कामे’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचा प्रभावी वापर केला. निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत 100 ठोस कामे पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला असून, त्यासाठी कोणत्या कामांना प्राधान्य दिले जाईल याची सविस्तर रूपरेषाही मतदारांसमोर मांडण्यात आली आहे.

पूर्व पुण्यातील महिलांसाठी नवी दिशा

येरवडा, वाघोली, लोहगाव, चंदननगर आणि खराडी हा पूर्व पुण्याचा भाग झपाट्याने विकसित होत आहे. या विकासाच्या प्रवासात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणे आणि त्यांना सक्षम करणे, हाच या महिला जाहीरनाम्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

मतदारांचा निर्णय महत्त्वाचा

महिलांवर केंद्रित स्वतंत्र जाहीरनाम्यामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. सुशिक्षित आणि आधुनिक दृष्टिकोन असलेल्या उमेदवाराच्या पाठीशी मतदार उभे राहतात का, आणि त्यांना पुणे महानगरपालिकाच्या सभागृहात पाठवतात का, हे पाहणे आता निर्णायक ठरणार आहे.

Web Title: Aishwarya surendra pathares special womens manifesto has been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Election News
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

आमच्या दादा , भाऊला निवडून द्या! लहान मुलांचा निवडणुकीसाठी सर्रास वापर
1

आमच्या दादा , भाऊला निवडून द्या! लहान मुलांचा निवडणुकीसाठी सर्रास वापर

Pune Election : प्रभाग 9 साठी राष्ट्रवादीचा प्रगती अहवाल अन् ‘जनहितनामा’ प्रसिद्ध
2

Pune Election : प्रभाग 9 साठी राष्ट्रवादीचा प्रगती अहवाल अन् ‘जनहितनामा’ प्रसिद्ध

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध
3

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच
4

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.