बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम चुरशीला पोहोचली असून महायुतीने पांडे चौकात भव्य शक्तीप्रदर्शन सभा घेतली. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या तेजस्विनी कथले तसेच सर्व 42 प्रभागांतील उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत माजी आमदार आणि भाजप नेते राजेंद्र राजाभाऊ राऊत यांनी भाजप आणि महायुतीच्या विजयाचा ठाम दावा केला. “जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या हातात काठी येत नाही, तो पर्यंत महाराष्ट्रात भाजपची सत्ता अबाधित राहणार,” असा जोरदार दावा करत त्यांनी वातावरण पेटवले. “देवेंद्र फडणवीसांचा ‘बेरर चेक’ म्हणून मला ओळखले जाते. महायुतीला मत दिले तर विकास हमखास होणार. केंद्रात भाजप, राज्यात महायुती आणि आता बार्शी नगरपालिका आमच्या ताब्यात आली तर शहराचा झपाट्याने विकास होईल,” असे प्रतिपादन राऊत यांनी केले.
.