सोलापूर शहर गुन्हे शाखेने उत्कृष्ट कामगिरी करत उत्तर सदर बझार परिसरात घडलेला खुनाचा गंभीर गुन्हा अवघ्या सहा तासांत उघडकीस आणला आहे. २६ डिसेंबर रोजी रात्री ते २७ डिसेंबर रोजी दुपारदरम्यान अयुब हुसेन सय्यद (तृतीयपंथी) यांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा गुन्हा तिघा आरोपींनी केल्याचे स्पष्ट झाले. तपासा दरम्यान आरोपी लातूरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळताच पोलीस पथकांनी लातूर येथे जाऊन यशराज कांबळे, आफताब शेख व वैभव पनगुले या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत चोरीच्या उद्देशाने खून केल्याची कबुली आरोपींनी दिली असून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम.राजकुमार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व सदर बझार पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना ३१ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.