नांदेड: नांदेड शहराचा जो काही विकास झाला आहे,तो तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे झाला आहे,जे आज आम्ही विकास केला,अशी वल्गना करत आहेत, त्यांनी थोडे आत्मपरीक्षण करावे,त्यांनी काँग्रेसला सत्ता दिली होती की,काँग्रेसने त्यांना सत्तेवर बसविले होते? असा सवाल उपस्थित करत माजी मंत्री तथा काँग्रेसचे निवडणूक प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी नाव न घेताअशोकराव चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने तयार केलेल्या वचननाम्याच्या प्रकाशन सोहळ्यासाठी ठाकरे हे नांदेडमध्ये,आले होते.यावेळी बोलतांना ते म्हणाले की,निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची युती झाली असून काँग्रेसच्या विचारांना मानणारी इथली जनता आहे.प्रत्येक निवडणुकीत जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे.त्यामुळे या निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल,असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.