Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : जनतेच्या घामाचा पैसा, लाचखोरांच्या घशात! प्रशासन अधिकारीच भ्रष्ट, नागरिकांनी कोणाकडे मागावा न्याय?

जनतेची कामे वेळेत, नियमांनुसार आणि पारदर्शकपणे व्हावीत म्हणून उभारलेली यंत्रणा अनेक ठिकाणी उलट नागरिकांनाच वेठीस धरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 01, 2026 | 07:07 PM
Kolhapur News : जनतेच्या घामाचा पैसा, लाचखोरांच्या घशात! प्रशासन अधिकारीच भ्रष्ट, नागरिकांनी कोणाकडे मागावा न्याय?
Follow Us
Follow Us:
  • जनतेच्या घामाचा पैसा, लाचखोरांच्या घशात!
  • प्रशासन अधिकारीच भ्रष्ट, नागरिकांनी कोणाकडे मागावा न्याय?
कोल्हापूर :  गगनबावडा तालुक्यातील शासकीय कार्यालयांबाबत नागरिकांच्या मनात असलेला विश्वास डळमळीत होत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे. जनतेची कामे वेळेत, नियमांनुसार आणि पारदर्शकपणे व्हावीत म्हणून उभारलेली यंत्रणा अनेक ठिकाणी उलट नागरिकांनाच वेठीस धरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तरीही तक्रार केली तर कामे वेळेत होणार नाही म्हणून अनेक जण तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. काम करायचे असेल तर हात गरम करा ही कुजबुज आता उघड चर्चेत आली आहे. त्यामुळे ‘कुंपणच शेत खातंय’ अशी तीव्र प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहे. दर काही महिन्यांनी एखाद्या अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा आरोप होत असल्याची प्रकरणे समोर येतात. नुकतेच शाहूवाडी पोलिस स्टेशन येथील प्रकरणाने खळबळ उडवली. कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेतीलच अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने नागरिकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारवाई, निलंबन, चौकशी अशा घोषणा केल्या जातात, मात्र काही दिवसांनी पुन्हा आहे तशाच तक्रारी समोर येतात, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

लोकशाही व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा
फक्त पोलिस विभागापुरतेच हे मर्यादित नसल्याची चर्चा आहे. महसूल, बांधकाम, ग्रामविकास आणि इतर शासकीय कार्यालयांमध्येही कामासाठी चहा-पाण्याची * अपेक्षा व्यक्त केल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. काही ठिकाणी दलालांची साखळी सक्रिय असल्याचे बोलले जाते. कार्यालयाबाहेरच काम लवकर करून देतो, असे सांगणारे मध्यस्थ दिसतात, ही बाब अधिक गंभीर मानली जाते. परिणामी, सामान्य नागरिकाला नियमांपेक्षा ‘व्यवस्था’ महत्त्वाची वाटू लागते, ही लोकशाही व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे.

Kolhapur News : विक्री प्रमाणपत्रसाठी भाडेवाढ, फेरीवाल्यांचं होतंय आर्थिक शोषण; संतप्त संघटनेचं महापौरांना साकडं

जनतेलाच आर्थिक ताण; संताप वाढतोय
शासकीय अधिकाऱ्यांना चांगले वेतन, सुविधा आणि सुरक्षित नोकरी उपलब्ध असतानाही किरकोळ रकमेसाठी हात पुढे केल्याच्या घटना उघड होणे ही खंत वाटणारी बाब आहे. शेतकरी कर्जासाठी धावतो, मजूर रोजंदारीसाठी उन्हात राबतो, छोटा व्यापारी कर भरतो आणि त्यालाच कामासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतात, यामुळे संताप वाढत आहे. जनतेच्या करातून पगार घेणारी यंत्रणा जनतेलाच आर्थिक ताण देत असेल, तर हा गंभीर प्रश्न आहे.

88 तालुक्यातील 2023 मध्ये महावितरणने लाईट परवाने बंद केले. त्यानतर सोलरला मंजुरी देण्यात आली, पण ती मंजूरी कागदावरच राहिली. यावरती पुढे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. यामुळे अनेक शेतकरी सोलरच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच गगनबावडा ठिकाणी डोंगराळ भाग असल्याने येथे मोटरीसाठी उंची जास्त असते त्यामुळे सोलरने पाणी चढणे कठीण होते म्हणून शासनाने यावर विचार करून पूर्वीप्रमाणे विद्युतपुरवठा सुरळीत करावा. – उत्तम बांडागळे, सामाजिक कार्यकर्ते

Kolhapur News : गाळेधारकांकडे ३५ कोटी थकीत, भाडेवसुलीसाठी मार्ग काढा; महापौरांच्या इस्टेट विभागाला सूचना

Web Title: The peoples sweat money is in the throats of bribe takers only the administration officials are corrupt from whom should the citizens seek justice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.