सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी माजल्याने त्यांचा मुजोरपणा दिसत आहे. कोण मारामारी करतोयं, कोण तांत्रिक मांत्रिक करतोयं.कोण पत्ते खेळतोयं अशा शब्दात शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी रम्मी गेम व्हायरल व्हिडीओवरुन कृषीमंत्र्यांवर हल्लाबोल केलायं..कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेण्यात आला.मेळाव्यानंतर विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय.कोल्हापुरात दैदिप्यमान असा शिवसेना ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा झाला असून पुन्हा शिवसेनेला कोल्हापुरात ताकद मिळाल्याचं त्यांनी म्हटलंयं..यावेळी डान्स बार, हनी ट्रँप प्रकरणावरून राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.यावेळी आमदार सुनील प्रभूंनी देखील सरकारवर टीका केलीये. महायुती सरकार खोटं आणि रेटून बोलत आहे..या लबाडांची माजोरगिरी जनता उतरवल्याशिवाय राहणार नसल्याच प्रभू यांनी म्हटलं आहे.