Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: महायुतीच्या विजयानंतर राजकीय हालचालींना वेग; पालकमंत्र्यांची मुंबईत सदिच्छा भेट

भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी व मल्हार पाटील यांनी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबई येथे शिवसेना नेते तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 11, 2026 | 07:05 PM
महायुतीच्या विजयानंतर राजकीय हालचालींना वेग; पालकमंत्र्यांची मुंबईत सदिच्छा भेट

महायुतीच्या विजयानंतर राजकीय हालचालींना वेग; पालकमंत्र्यांची मुंबईत सदिच्छा भेट

Follow Us
Follow Us:
  • महायुतीला मिळालेल्या यशानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग
  • भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी व मल्हार पाटील
  • शिवसेना नेते तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : राज्यातील २९ महानगरपालिकांसह मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. शिवसेना भाजपला बहुमत मिळाले असून निवडणुकांनंतर नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवक पदांसाठी राजकीय हालचालींना वेग आला. 227 नवनिर्वाचित नगरसेवक आणि 10 नामनिर्देशित सदस्य असे मिळून एकूण 237 नगरसेवकांचे सभागृह यावेळी पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी व मल्हार पाटील यांनी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबई येथे शिवसेना नेते तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत जिल्हा परिषदेतील सत्तास्थापना, पुढील रणनीती आणि विकासकामांचा आराखडा यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Satara News : आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी

नगरपालिका निवडणुकीनंतरचा हा महायुतीचा सलग विजय मानला जात असून, ग्रामीण भागात महायुतीला मिळालेला पाठिंबा विशेष लक्षणीय ठरला आहे. जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि राज्यातील नेतृत्वाचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याचे दत्ता कुलकर्णी व मल्हार पाटील यांनी सांगितले. आगामी काळात महायुतीची एकजूट अधिक बळकट करून विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील भाजपाचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून विविध विकास योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्यामुळे पायाभूत सुविधा, ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा झेंडा फडकल्याने प्रशासन आणि विकास यामध्ये समन्वय साधत जलद निर्णयप्रक्रिया राबवता येणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, महायुतीकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai High Court: महात्मा गांधींवर निबंध लिहिणाऱ्या बलात्काराच्या दोषीची शिक्षा कमी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने खळबळ

 

 

 

Web Title: After the maha yuti victory political movements gain momentum caretaker ministers goodwill visit in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 07:05 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
1

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
2

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा
3

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.