दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पहिला दिवा अर्पण करून करण्यात आला. मागील 11 वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेचा मान राखत राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष निखिल गोळे यांनी उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि दिवाळीचा पहिला दिवा उजळवला. या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी “जय भवानी! जय शिवाजी!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. दिवाळीच्या या शुभारंभी महाराजांना अभिवादन करून देशभक्ती, ऐक्य आणि संस्कृतीच्या जतनाचा संदेश देण्यात आला.