संगमेश्वर तालुक्यातल्या कसबामधील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे 11 मार्च रोजी धर्म रक्षण दिनानिमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अलौकिक गाथेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अधटराव यांनी दिली आहे. भाजपचे जेष्ठनेते, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी “सिंहाच्या छाव्याची अलौकिक गाथा” या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री नितेश राणे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार प्रमोद जठार, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित राहणार आहेत.