Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी! कोयना अभयारण्यातून चिपळूणकडे प्रवास; जीपीएस सिग्नलनंतर वनविभाग सतर्क

'हिरकणी'चा वावर पूर्णपणे नैसर्गिक असून नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. वाघिणीला कोणताही त्रास न देता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 15, 2026 | 02:24 PM
सह्याद्रीच्या डोंगरकपारीत 'हिरकणी'ची डरकाळी! कोयना अभयारण्यातून चिपळूणकडे प्रवास; जीपीएस सिग्नलनंतर वनविभाग सतर्क

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत 'हिरकणी'ची डरकाळी! कोयना अभयारण्यातून चिपळूणकडे प्रवास; जीपीएस सिग्नलनंतर वनविभाग सतर्क

Follow Us
Close
Follow Us:

कोयना अभयारण्य येथील मध्यवर्ती सुरक्षित जंगलात नुकतीच सोडण्यात आलेली ‘हिरकणी’ (एसटीआर ०६) वाघीण आता चिपळूणच्या माध्यावरील जंगलांच्या दिशेने प्रवास करत असून तिच्या हालचाली नांदिवसे परिसरातील डोंगरकपारीत आढळून आल्या आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मॉनिटरिंग सेंटरकडून प्राप्त झालेल्या जीपीएस सिग्नलनंतर चिपळूण वनविभाग तातडीने सतर्क झाला आहे. बुधवारी सायंकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदिवसे गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि खबरदारीच्या सूचना दिल्या. डोंगराळ भागात एकटे जाणे टाळावे, गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत व रात्री विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले.(फोटो सौजन्य – istock)

‘हापूस’कडून निराशा! मोहोर ७० टक्के मात्र फळ केवळ…; उत्पादन खर्च मिळणेही अवघड

‘हिरकणी’चा वावर पूर्णपणे नैसर्गिक असून नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. वाघिणीला कोणताही त्रास न देता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून वाघिणीच्या हालचालींवर सातत्याने जीपीएसद्वारे लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, ‘हिरकणी’च्या नांदिवसे परिसरातील एन्ट्रीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून पुढील काही दिवस या परिसरावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.

पेंचमधून एन्ट्री, ऐतिहासिक मुक्त संचार सुरू:

पेंच व्याघ्र प्रकल्प अंतर्गत नागलवाडी परिक्षेत्रात ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एसटीआर ०६ या वाघिणीला पकडण्यात आले. पशुवैद्यकीय तपासणीनंतर ६ फेब्रुवारीला तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले आणि ७ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता कोयना अभयारण्यातील सुरक्षित क्षेत्रात सोडण्यात आले. त्यानंतर ‘हिरकणी’चा ऐतिहासिक मुक्त संचार सुरू झाला. यापूर्वी एसटीआर ०३ हा ‘बाजी’ नर वाघ तसेच ‘तारा’ आणि ‘चंदा’ या वाघिणी सह्याद्री व्याघ्न प्रकल्पात दाखल आहेत. आता ‘हिरकणी’च्या समावेशामुळे प्रजननवृद्धीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

चिपळूण तालुक्यातील नांदिवसे गावच्या डोंगराळ भागात जिथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची हद्द आहे. त्या परिसरात हिरकणीची एन्ट्री झाली आहे. परंतु गावातील ग्रामस्थांना त्याचा कोणताही धोका नाही. येथील नागरिकांनी जंगलात जाऊ नये. वाघ किंवा इतर कोणताही प्राणी दिसल्यास प्रथम वनविभागाची संपर्क करावा, सताप्पा सावंत, वनपाल, यांनी असे मत व्यक्त केले आहे.

HSRP नंबर प्लेटबसवण्यात ‘हा’ राज्यात अव्वल; RTO ने दिलेल्या माहितीनुसार…

११६५ चौ.कि.मी.चा व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध परिसर

सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत पसरलेला सुमारे ११६५ चौरस किलोमीटरचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध आणि अनेक दुर्मिळ प्रजातींचे अधिवास असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या परिसरात वाघांचे संवर्धन आणि नैसर्गिक अधिवास मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The horror of hirakani in the hills of sahyadri travel to chiplun from koyna sanctuary forest department alerted after gps signal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Kokan News
  • Ratnagiri
  • tiger

संबंधित बातम्या

रत्नागिरीत चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडले; शटर उचकटून तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल लंपास
1

रत्नागिरीत चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडले; शटर उचकटून तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल लंपास

Ratnagiri : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभेत घरपट्टीचा गोंधळ, नागरिक त्रस्त
2

Ratnagiri : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभेत घरपट्टीचा गोंधळ, नागरिक त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.