पाचगणी येथील पठारावर एका युवकाचा पॅराग्लायडिंग करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओची पडताळणी केली असता संबंधित युवक वाईजवळच्या पाचगणी येथील पसरणी गावचा आहे. समर्थ महांगडे असे युवकाचे नाव असून तो पाचगणी मध्ये काही कामानिमित्त आला असताना त्याच्या मित्रांनी त्याला फोन करून एक डिसेंबर मध्ये पुढे ढकललेली परीक्षा 15 डिसेंबरला असल्याचे सांगितले हा प्रकार अचानक लक्षात आल्या नंतर पाचगणी येथील थापा पॉइंट येथील जी पी एडवेंचरचे गोविंद येवले यांच्या मदतीने त्याने पॅराग्लायडिंग करत वाई येथील किसनवीर कॉलेजला पोहोचला त्या ठिकाणी मित्राला बोलावून कॉलेजची आयडी गणवेश आणून त्याने परीक्षा दिली.हा व्हिडिओ 15 डिसेंबर रोजी काढण्यात आला आहे. पॅराग्लायडिंग करणारा युवक समर्थ महांगडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी.