सोलापूरच्या राजकारणात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या एका मोठ्या घडामोडीने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला भारतीय जनता पार्टीने मोठा राजकीय दणका दिला आहे.
शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, काँग्रेसमधील दोन प्रमुख पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यावर वेगवेगळ्या पक्षात पक्षप्रवेश होतातच. स्थानिक राजकारण, एखाद्या पक्षाला अनुकूल वातावरण पाहून पक्षांतर होते. तसे याहीवेळी घडले. भाजपमध्ये अक्षरशः घाऊक प्रमाणात पक्ष प्रवेश झाले.
सत्ताधारी पक्षांच्या विजयात निवडणूक आयोगाची मदत सर्वात महत्वाची ठरली आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने १२९ नगराध्यक्षांसह ३३०२ जागांवर विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाला 'इतिहासातील सर्वात मोठे यश' म्हटले आहे.
अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठा वर्धक ठरलेल्या सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भाजपच्या उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप या तब्बल 1091 मते घेऊन निवडून आल्या आहेत.
अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र असले, तरी याच पार्श्वभूमीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पिंपरी- चिंचवडमधील सर्वपक्षीय २२ दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित होते.
नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची लोकांची तीव्र भावना आहे, या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांना बदली झालेल्या ठिकाणी शिक्रापूर येथे रुजू होण्यासाठी यवत येथून अखेर सोडण्यात आले आहे, अशी माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
ऊस वाहतूक करणार्या १२ ते १३ ट्रॅक्टरवर भिगवण पोलिसांकडून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.