Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार; 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ग्रामीण आणि उपनगरीय भागातील स्वच्छतेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 16, 2026 | 12:38 PM
पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार; हद्दीतील 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प

पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार; हद्दीतील 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प

Follow Us
Follow Us:
  • पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार
  • हद्दीतील 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प
  • नदी सुधार प्रकल्पालाही वेग
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ग्रामीण आणि उपनगरीय भागातील स्वच्छतेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. विविध विकास केंद्रांमधील सांडपाणी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी ३०० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेसह एकूण १,२०९.०८ कोटी रुपयांचा भव्य आराखडा तयार करण्यात आला आहे. पुणे महानगर हद्दीतील २७ गावांमध्ये मैला व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारणार आहे. या प्रकल्पामुळे इंद्रायणी, पवना आणि मुळा या नद्यांच्या प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.

 

पाच तालुक्यांचा समावेश

या उपक्रमांतर्गत खेड, मावळ, मुळशी, हवेली आणि शिरूर या पाच तालुक्यांमधील निवडक गावांमध्ये सिव्हर नेटवर्क आणि प्रक्रिया केंद्रे उभारली जाणार आहेत. विशेष म्हणजे, संबंधित कंत्राटदारावर केवळ बांधकामाचीच नव्हे, तर पुढील ५ वर्षे संचालन व देखभाल आणि ५ वर्षांचा दोष दायित्व कालावधी अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे.

तालुकानिहाय प्रकल्पाचा खर्च:

हवेली (८ गावे) : ३२० कोटी १६ लाख रुपये (सर्वाधिक खर्च)

मुळशी (६ गावे) : २७२ कोटी १३ लाख रुपये

शिरूर (४ गावे) : २४४ कोटी २३ लाख रुपये

खेड (७ गावे) : १३५ कोटी १० लाख रुपये

मावळ (२ गावे) : ४ कोटी ५३ लाख रुपये

नदी सुधार प्रकल्पालाही वेग

‘पीएमआरडीए’ने इंद्रायणी व पवना नदी सुधार प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. पवना नदी सुधारणेसाठी पुढील आठवड्यात निविदा प्रसिद्ध होण्याची शक्यता असून, सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा : माळेगावमधील प्रभाग नऊमध्ये विकासकामांना प्रारंभ; ‘विशिष्ट नागरी सेवा व सुविधा’ योजनेअंतर्गत होणार विविध कामे

ठळक वैशिष्ट्ये:

प्रदूषण मुक्ती : नद्या आणि ओढ्यांचे प्रदूषण कमी होऊन भूजल पातळीची गुणवत्ता सुधारेल.

वेळापत्रक : दीड महिन्याच्या निविदा प्रक्रियेनंतर कंत्राटदारांची नियुक्ती होऊन कामाला गती मिळेल.

आधुनिक तंत्रज्ञान : डिझाइन, पुरवठा आणि उभारणी अशा सर्व स्तरांवर अत्याधुनिक प्रणालीचा वापर.

हे सुद्धा वाचा : वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

Web Title: Pmrd has taken a big decision for cleanliness in rural and suburban areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • PMRDA
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.