कल्याण ग्रमीण भागातील 27 गावांना अद्यापही प्राथमिक सोयीसुविधांसाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. या गावकऱ्यांना पाण्यासाठी देखील पायपीट करावी लागत आहे. गेले सहा ते आठ महिने नागरिक कायमच पाण्यासाठी वणवण करीत आहे. अशी माहिती आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे. मोरे म्हणाले की, जनतेने मतांच्या स्वरुपात समादकार्यासाठी मला आशीर्वाद दिला आहे. त्यांचा हाच विश्वास सार्थ ठरविण्यासाठी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात कल्याण ग्रामीणच्या समस्या मांडणार असल्याचं राजेश मोरे यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीणचा प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दरम्यान या सगळ्या समस्या लवकरात लवकर सुटण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे.