दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! भक्ष्यासाठी सिंह-सिंहीण एकमेकांविरुद्ध भिडले अन् तितक्यातच म्हैस गेली पळून; Video Viral
जंगलात अनेक मजेदार आणि शिकारीचे रंजक किस्से घडत असतात, जे पाहणे नेहमीचे मनोरंजक ठरते. हे दृश्य बऱ्याचदा सोशल मिडियावर शेअर केले जातात जे पाहता क्षणीच इथे व्हायरल होतात. आता शिकार करताना ती फार शिताफीने आणि कोणतीही चूक न करावी लागते आपली एक चूक भक्याला पळून जाण्यास मदत करु शकते आणि आताच्या व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याते दिसून आले. जंगलाचा राजा आणि राणी स्वत:च्या भांडणातच असे मग्न होऊन जातात की त्यांचे आपल्या भक्ष्यावरही लक्ष राहत नाही आणि परीणामी भक्षक गूपचूप तिकडून आपला पळ काढतो. अखेर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ कसा होते याचे मजेदार दृश्य या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळते. चला व्हिडिओत काय घडलं ते विस्तारपूर्वक जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक म्हैस सिंह आणि सिंहीणींच्या कळपात वाईटरित्या अडकल्याचे दिसून येते. सर्वांनी म्हशीवर इतकी जबरदस्त पकड ठेवलेली असते की ते पाहून म्हशीचे यातून बाहेर पडणे कठीण दिसू लागते. सर्व मिळून आपल्या भक्ष्याला फस्त करणार तितक्यातच त्यातील एका सिंह-सिंहीणीमध्ये भांडण सुरु होत. हे भांडण पुढे जाऊन एवढं वाढत की शेवटी बाकीच्यांनाही भक्ष्याला सोडून त्यांच भांडण मिटवण्यासाठी त्यांच्यात पडाव लागतं. शेवटी संधीचा फायदा घेत म्हैस लगेचच तिथून आपला पळ काढते आणि गुपचूप तिकडून पळून जाते. व्हिडिओच्या शेवटी सर्व सिंह-सिंहीण एका बाजूने आणि म्हैस दुसऱ्या बाजूने पळताना दिसून येते.
Lions fight over a water buffalo while eating it, and then the buffalo casually walks off. What lesson did you learn from this? pic.twitter.com/6CFuivvQDz — Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) September 23, 2025
शि्कारीचा हा मजेदार खेळ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सिंह एका म्हशीला खाताना तिच्यावर भांडतात आणि मग ती म्हशी सहज निघून जाते’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दुसरा सिंह म्हशीला म्हणाला नाही, आम्ही हे सगळं व्यवस्थित करतो तोपर्यंत तू इथेच थांब” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाग्यवान म्हैस” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तुमचा विश्वास कधीही गमावू नका”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.