(फोटो सौजन्य: Instagram)
चोली के नीचे क्या है… बॉलिवूडचं हे सुपरहिट गाणं तुम्ही कधी ना कधी तर नक्कीच ऐकलं असेल. या गाण्याचीच आठवण करून देणारा एक अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओत इतके अनोखे आणि थक्क करणारे दृश्य दिसून आले की ज्याने ते पाहिले त्याचे होश उडून गेले. वास्तविक, यात एक महिला घागरा चोली घालून डान्स करताना दिसून येते. पण तितक्यातच ती आपल्या चमत्काराने एका भल्यामोठ्या सिलेंडरला असं गायब करते की सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात एक महिला नटून, घागरा चोली घालून सर्वांसमोर आपले नृत्यू सादर करत आहे. एक वर्तुळ करून सर्वच महिलेचा डान्स पाहण्यास उत्सुक असतात पण पुढच्याच क्षणी असं काही घडत ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडिओमध्ये महिला एक सिलेंडरजवळ जाताना दिसते. सिलेंडरवर बसून ती आपल्या घागऱ्यात त्याला लपवते आणि मग पुढच्याच क्षणी तिथून उठून डान्स करू लागते. या सर्व घटनेत घागऱ्यात लपवलेला सिलेंडर मात्र अचानक गायब होऊन जातो, जे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाल्याचे दिसून येते. सिलेंडरचं नक्की काय झालं, तो कुठे गेला हे गूढ मात्र शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहतं. हा अजब-गजब आणि चमत्काराने भरलेला व्हिडिओ इंटरनेटवर आता चांगलाच व्हायरल होत आहे.
@jatavni_ji नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या व्हिडिओला शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे लेहंगा आहे की डोरेमॉनचं पॉकेट” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सिलेंडर नक्की गेला कुठे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे नक्की घडलं काय?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.