
7 सिंहांना एकट्या सिंहीनीने दिली झुंज, जंगलात दिसले सत्तेचे दुर्लभ दृश्य... पाहून सर्वच अवाक्; Video Viral
सोशल मिडियावर आफ्रिकेतील कालाहारी वाळवंटातील एक रोमांचक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सात जंगली सिंह एका सिंहीणीवर हल्ला चढवताना दिसून आले. एकाकी सिंहीणीच्या अभयारण्यात सिंहाच्या गटाने प्रवेश केला खरा पण हा सिंहीण साधीसुधी नसून ती होती प्रसिद्ध “सिर्गा” सिंहीण निघाली. तिला लहानपणापासूनच तिचा केअरटेकर व्हॅलेंटाईन ग्रुनर याने वाढवले आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नर सिंह, दोन सिंहीणी आणि चार बछड्यांचा एक गट सिर्गाच्या २००० हेक्टरच्या अभयारण्यात प्रवेश करताना दिसत आहे. ग्रुनरने इंस्टाग्रामवर स्पष्ट केले की रात्रीच्या वेळी सिंह आणि सिर्गा कुंपणाच्या पलीकडे भिडले. त्याने लिहिले, “क्षणभर असे वाटले की परिस्थिती धोकादायक होईल, परंतु सिर्गाने हुशारीने माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि आपला जीव वाचवला.”
हा कळप काही तास अभयारण्यात राहिला, परंतु नंतर ग्रुनर आणि इतर वन्यजीव तज्ञांनी त्यांना जंगलात परत पाठवले. “जर त्यांनी अभयारण्यात काहीतरी शिकार केली असती किंवा पाण्याचा स्रोत सापडला असता, तर ते तिथेच राहिले असते आणि सिर्गाचा प्रदेश ताब्यात घेतला असता,” असे ग्रुनर यांनी स्पष्ट केले. “मात्र सुदैवाने, असे झाले नाही आणि सिर्गा सुरक्षित आहे.” ग्रुनरच्या मते, “जर सिर्गाने त्यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला तर ते तिला मारुन टाकतील. सिंहाचे दोन गट हे कधीही एकत्र येत नाहीत. प्रत्येक गटाचे स्वतःचे क्षेत्र, अन्न आणि पाणी असते. सिर्गासाठी, हे अभयारण्य तिचे घर आहे आणि ती तिचे स्थान कोणालाही देऊ इच्छित नाही.
या व्हिडिओला @sirgatheliones नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला 5 लाखाहून अधिकचे व्युज मिळाले असून सिर्गाच्या सुरक्षिततेबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. एका युजरने लिहिले आहे, “कॅप्शन वाचून मी जवळजवळ रडलो. अरे देवा, मला खूप आनंद आहे की सिर्गा बाळ सुरक्षित आहे! आणि दुसरा गटही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते खूप सुंदर आहेत. मला आनंद आहे की संघर्षामुळे त्यांच्यापैकी कोणालाही नुकसान झाले नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सिर्गा सुरक्षित आहे याचा खूप आनंद आहे, किती सुंदर छोटे कुटुंब आहे. मी प्रार्थना करतो की ते सर्व सुरक्षित राहतील ”.
सिर्गा कोण आहे?
सिर्गाचा जन्म 2012 मध्ये बोत्सवानामध्ये झाला होता. ग्रुनरने तिला फक्त 10 दिवसांची असताना वाचवले होते. आता ती 2000 हेक्टरच्या अभयारण्यात मुक्तपणे राहते, जिथे ती स्वतः शिकार करते आणि नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेते.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.