Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अशोक सराफ आणि सचिन पिळगावकरांनी लुटला ‘या’ जागेतील वडापावचा आनंद, Video होतोय Viral

नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अशोक सराफ आणि सचिन पिळगावकरांनी लुटला मुंबईच्या फेमस वडापावचा आनंद. व्हिडिओ होतोय व्हायरल. वडापाव स्पॉटचे नाव जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 25, 2024 | 10:06 AM
अशोक सराफ आणि सचिन पिळगावकरांनी लुटला 'या' जागेतील वडापावचा आनंद

अशोक सराफ आणि सचिन पिळगावकरांनी लुटला 'या' जागेतील वडापावचा आनंद

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईची आण-बाण-शाण असलेला वडापाव कोणाला आवडत नाही. वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव! सामान्यांनाच काय तर मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही हा वडापाव अत्यंत प्रिय आहे. सध्या या वडापावचाच व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लवकरच नवरा माझा नवसाचा 2 चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनी ,मुंबईच्या फेमस वडापावचा आनंद लुटला आहे. त्यांचा वडापाव खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे.

व्हिडिओ व्हायरल

मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेत ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांनी एकत्र प्रवास केला. प्रवास करताना त्यांनी एका प्रसिद्ध वडापावचा आनंद लुटला आहे. याचा एक व्हिडिओ सचिन पिळगावकरांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या व्हिडिओला त्यांनी, “माझ्या बाजूला अशोक अन् हातात अशोकचा वडापाव… हा बडाभाव आणि हा वडापाव”, असे म्हटले आहे.

हेदेखील वाचा – आईस्क्रीममधील मानवी बोटानंतर आता चॉकलेटमध्ये बनावटी दात आढळून आले, धक्कादायक घटनेचा Video Viral

कोणत्या जागेवरून खाल्ला वडापाव?

अशोक सराफ आणि सचिन पिळगावकरांच्या वडापावचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांना हा व्हिडिओ फार आवडला आहे. त्यांनतर अनेकांना प्रश्न पडू लागला की, या दोन दिग्ग्ज कलालकरांनी नक्की कोणत्या जागेचाच्या वडापाव आस्वाद घेतला तर आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो, हे स्पॉट दुसरे तिसरे कोणते नसून कीर्ती कॉलेजच्या समोरील प्रसिद्ध वडापावचे दुकान आहे. या जागेचा वडापाव देशभर प्रसिद्ध आहे. या वडापाव स्पॉटची खासियत म्हणजे, इथे तुम्हाला वडापावसोबत कुरकुरीत चुरादेखील दिला जातो.

मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्ग्ज कलाकार आजही आपली मूळ आवड विसरले नाहीत आणि त्यांनी सामान्यांप्रमाणे लुटलेला हा वडापावचा आनंद पाहून अनेकजण सुखावले आहेत. अनेकांनी व्हायरल व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

 

Web Title: Actor ashok saraf and sachin pilgaonkar enjoying mumbai vadapav video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 08:40 AM

Topics:  

  • ashok saraf
  • sachin pilgaonkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.