Amazing viral news A stone in the world that never sinks in water
आपले जग हे विविधतेने नटलेले आहे. जगात अशा अनेक अद्भुत गोष्टी आहेत, ज्या ऐकून आपला त्यावर विश्वास बसत नाही परंतु त्या गोष्टी खऱ्या असतात. पृथ्वीवरचं जीवनच अद्भुत अशा गोष्टींनी भरलेलं आहे. पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची कल्पना आजही लोकांना नाही. या गोष्टी अशा असतात ज्याबाबत माहिती समोर आल्यावर संशोधकही हैराण होतात. तुम्ही बालपणी एक गोष्ट ऐकली असेल. ज्यात एक कावळा तहान लागल्यानंतर एका मडक्यात थोडे पाणी टाकल्यावर त्यात खडे टाकून पाणी वर आणतो आणि आपली तहान भागवतो.
रामायणात तुम्ही तरंगणाऱ्या दगडांबद्दल ऐकलं असेल, या दगडांनी रामसेतु बांधल्याचं देखील वाचलं किंवा ऐकलं असेल. याला लोक रामाचा महिमा म्हणतात. सामान्यपणे कोणतेही दगड पाण्यात बुडतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, जगात एक असाही दगड आहे जो पाण्यात बुडण्याऐवजी पाण्यावर तरंगतो. सामान्यपणे कोणत्याही जड वस्तू किंवा दगड पाण्यात बुडतात. पण प्यूमिस स्टोन हा नियम तोडतो. कारण तो पाण्यात बुडत नाही.
हा दगड फार खरदळ, छिद्र असलेला आणि स्पंजसारखा असतो. याचं वजन इतर दगडांच्या तुलनेत फार कमी असते. हा दगड दिसायला अगदी आतून पोकळ आणि हलका असतो. त्याच्या रचनेत असंख्य सूक्ष्म छिद्र असतात, जे हवेने भरलेले असतात आणि यामुळे तो पाण्यावर तरंगतो. ते हलके असतात आणि पाण्यावर तरंगतात. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा गरम लाव्हारस वेगानं थंड होता आणि त्यातील गॅस अडकून दगडांमध्ये छोटे छोटे छिद्र निर्माण करतो.
याच प्रक्रियेमुळे प्यूमिस स्टोन तयार होतात. जे नंतर समुद्रात सापडतात. या दगडांचा वापर सौंदर्य प्रसाधने, बांधकाम आणि स्क्रबिंगसाठी केला जातो. जगातील लोकांना या खास दगडाबाबत फार कमी माहीत असते. त्यामुळे यापुढे एखादा असा दगड पाण्यात टाकल्यावर अचंबित होऊ नका. हा तोच रहस्यमय प्यूमिस स्टोन असू शकतो.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.