इस प्यार को क्या नाम दू! ट्रेनमध्ये चढण्याआधी नवऱ्याने बायकोसाठी केलं असं काही; पाहून लोकांनी डोक्याला हात लावला, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असता. स्टंट, जुगाड, डान्स रिल्स असे अनेक भन्नाट व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही मुबंई लोकलचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. प्रवाशांनी खचाखच भरलेली मुबंई लोकल सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असते. कधी लोकलमध्ये रिल बनवतानाचे व्हिडिओ पाहायला मिळतात, तर कधी प्रवाशांच्या गाण्याची मैफील पाहायला मिळते, कधी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर कधी भांडणांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक अनोखा प्रेमाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक जोडपे पाहायला मिळत आहे. या विवाहित जोडप्याने असे कृत्य केलं आहे की, पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन वाऱ्याच्या वेगाने प्लॅटफॉर्म जवळ येत आहे. दरम्यान एक व्यक्ती धावत्या ट्रेनच्या बाजूला रेल्वेच्या रुळाशेजारी उभी राहिली आहे. ट्रेन थांबल्यानंतर तो महिलांच्या डब्याजवळ जातो. तुम्ही पाहू शकता की, ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. तसेच महिलांच्या डब्ब्यातही खूप गर्दी असते. एक महिला डब्ब्याच्या अगदी दरवाज्याच्या खांबाला धरुन बाहेरच्या बाजूने उभी राहिलेली असते. तो व्यक्ती त्या महिलेजवळ जातो आणि त्याच्या हातात असलेली बॅग तिला देतो. नंतर स्वत: पुढच्या डब्यात जाऊन बसतो. त्याची ही कृती प्लॅटफॉर्मवरील एका व्यक्तीने कॅमेरात कैद केली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @vaibhav_ki_mandali या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मला आश्चर्य वाटतंय की या बॅगेत काय आहे.. तो स्वतःचा जीव धोक्यात घालून ती बॅग तिला का देत आहे.. ही कसली देवाण-घेवाण आहे… काय मजबुरी होती.. कोणतं आणि काय आयडियाज/ऑप्शन्स आहेत ना भाई? अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या एकाने त्याने फक्त बॅग तिच्याकडे दिलं यात एवढं काय आहे असा प्रश्न केला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.