भगवान श्रीरामांचे अनेक फोटो आपण इंटरनेटवर पाहतो पण वास्तविकेत जेव्हा भगवान राम 21 वर्षांचे होतो तेव्हा कसे दिसले असतील? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रश्नाच उत्तर अखेर मिळालं आहे तेही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने. एआयने भगवान श्रीराम यांच्या तरुणपणाच एक चित्र तयार करून दिलं आहे. (Bhagwan Ram AI Image) हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हो फोटो पाहुन नेटकरी भारावुन गेले आहेत.
[read_also content=”म्यानमार लष्कराचा नागरिकांवर हवाई हल्ला; 100 हून अधिकांचा मृत्यू, संयुक्त राष्ट्रानं केला निषेध https://www.navarashtra.com/world/100-killed-in-air-strike-by-myanmar-junta-on-pazigyi-village-nrps-383662.html”]
AI generated image of Prabhu Shri Ram, when he was 21-year-old.????????? #JaiShreeRam pic.twitter.com/zKkhZRK6lq
— Ms.पॉजिटिविटी ?? (@No__negativtyxd) April 11, 2023
AI ने तयार केलेले दोन फोटो सध्या सोशल मिडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. इंटरनेट युजर्सना हे फोटो खूप आवडले आहेत. यावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. कुणीही या फोटोला पाहुन भारावुन जात आहे. पहिल्या चित्रात भगवान श्री राम यांच्या चेहऱ्यावरील हावभाव सामान्य आहेत, तर दुसऱ्या फोटोत ते हसताना दिसत आहेत. प्रभू रामाचे हे आराध्य चित्र पाहून लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. काही लोक म्हणतात की आजपर्यंत या पृथ्वीवर इतका देखणा कोणीही जन्माला आलेला नाही. यासोबतच ते सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर केले जात आहेत.हा फोटो शेअर करताना लोक त्याच्या कॅप्शनमध्ये लिहित आहेत की, वाल्मिकी रामायण, रामचरितमानससह सर्व ग्रंथांमध्ये दिलेल्या तपशीलानुसार, हा भगवान रामाचा एआय-जनरेट केलेला फोटो आहे. त्यानुसार वयाच्या २१व्या वर्षी श्रीराम असे दिसायचे.
‘…तर तो खऱ्या राममध्ये कसा दिसत असेल’
एका यूजरने लिहिले की, ‘कृत्रिम फोटो इतका गोंडस असेल तर तो खरा कसा दिसेल.’आणखी एका यूजरने म्हण्टयं की, ‘हे चित्र वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानससह सर्व ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार बनवले गेले आहे. म्हणूनच वयाच्या २१व्या वर्षी प्रभू राम असे दिसले असावेत, असे वाटते. या फोटोवर अनेकांनी ‘जय श्री राम’ लिहिले आहे.वयासोबतच लोकांनी ‘जय सिया राम’ही लिहिले आहे.
टनाव जितकं सुंदर आहे, तितकाच सुंदर आमचा राम’
हे चित्र कोणी व्हायरल केले, त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. ज्या व्यक्तीने ते बनवले त्याबद्दल काहीही माहिती नसली तरी लोक त्याच्या कामाचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘नाव जितकं सुंदर आहे, तितकाच सुंदर आमचा राम आहे. ‘सध्या सोशल मीडियावर AI चे फोटो खूप व्हायरल होत असल्याची माहिती आहे. याआधी काही ठिकाणचे AI फोटोही समोर आले आहेत, जे लोकांना खूप आवडले आहेत.