BMC closed Dadar Kabutarkhana from all side Hundreds of pigeons still in the square, viral photo
सध्या मुंबईच्या दादर परिसरातील कबुतर खाणा चर्चेचा विषय बनला आहे. मुंबईच्या उच्च न्यायालयाने आणि मुंबई पाकिस्ताने हा कबुतर खाना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यावर जैन आणि गुजरात समाजातील लोकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येथे जैन आणि गुजराती समाजातील लोक दररोरज कबुतरांना दाणा घालण्यासाठी येतात. त्यांना बघण्यासाठी देखील शेकडो लोकांची गर्दी येथे जमते. परंतु आता हा कबुतर खाना बंद करण्यात आला आहे. यावर ताडपत्री टाकून तो झाकण्यात आला आहे.
ही बातमी माणसांपर्यंत तर पोहोचली, पण हे त्या निरागस पक्ष्यांना कोण सांगणार? या कबुतरांना कोण सांगणार की आता तुम्हाला अन्ना-पाण्याच्या शोधात दुसरीकडे जावे लागेल. हे पक्षी आपले घरे समजून तिथे येणारच. सध्या सोशल मीडियावर याचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये कबुतर खाना बंद करण्यात आला आहे, परंतु त्यावर शेकडो कबुतरे येऊन बसलेली दिसत आहेत. नक्कीच ही कबुतरे तिथे अन्नाच्या शोधात आलेली आहेत. आता त्यांना प्रश्न पडला असेल की, इथे काय सुरु आहे. आपले अन्न-पाणी कुठे आहे? रोज आपल्याला बघणारे हाकलून का लावत आहेत? आपल्याला अन्न का देत नाहीयेत? असे अनेक प्रश्न त्यांना पडत असतील. आता त्यांना अन्न-पाण्यासाठी त्यांचा दुसरा ठावठिकाणा शोधावा लागले. पण ही कबुतरे सहजपणे तिथून निघून जातील यामध्ये जरा शंकाच आहे. या फोटोने सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
जैन आणि गुजरातील समाजाने भूकेल्या पक्ष्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु त्यांचे कबुतर खाना पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु होतील का? की पक्ष्यांना त्यांचे घर सोडून तिथून जावे लागले? असा प्रश्न सर्वांना पडल आहे. जैन समाजाने ताडपत्री फाडून टाकली आहे, कबुतरांना अन्न-पाणी देखील दिले आहे, परंतु अजूनही काही लोकांकडून कबुतर खाना बंद करण्यासाठी मागणी होत आहे. कबुतरांमुळे त्यांना श्वसनाचा, त्रास होत असल्याचे लोकांनी म्हटले आहे. तसेच कबुतरांच्या विष्ठेमुळे स्थानिकांना त्वतेचे, श्वसनाचे त्रास होत आहे. यामुळे रोग उत्तपन होतील असे म्हटले जात आहे. याचे कोर्टात पुरावे देखील सादर करण्यात आले आहेत. यामुळे कोर्टाने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
BMC has totally covered by Dadar Kabutarkhana today from all sides. Feeding of pigeons will attract penal & legal action said officials. Pics shot by @sanjayhTOI pic.twitter.com/2ejNbocMJW
— Richa Pinto (@richapintoi) August 3, 2025
सध्या व्हायरल होत असलेला फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @richapintoi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. कोणी हा कबुतर खाना बंद करम्यावर सहमती दर्शवली आहे, तर कोणी हा कबुतर खाना पुन्हा सुरु करण्याचे म्हटले आहे. जसा मानवाला स्वत:साठी अन्न-पाणी शोधण्याचा, खाण्या-पिण्याचा अधिकार आहे तसेच या पशु-पक्ष्यांना देखील आहे. त्यांचे अधिकार आपण काढून घेऊ शकत नाही, असे काहींनी म्हटले आहे. सध्या हा विषय सर्वत्र जोरदार चर्चेचा बनला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.