महाराष्ट्रातल्या ST स्टँडवरील दिव्यांगाची अवस्था पाहून काळीज हळहळेल
सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओज आपल्या हसवतात तर काही अक्षरशः डोळ्यात पाणी आणतात. यात कधी कोणत्या गरिबाला मदत करताना दिसतं तर कधी कोणी रस्त्यावरील लहान मुलांना आनंद वाटतं दिसतं, हे असे अनेक व्हिडिओ पाहून टचकन आपल्या डोळ्यात पाणी येतं. अनेकदा आपण धडधाकट असतानाही अनेक गोष्टींबाबत तक्रार करतो मात्र दिव्यांग आहेत त्यांना आपल्या नेहमीच्या आयुष्यात किती गोष्टींचा सामना करावा लागत असेल याचा आपण विचारही करू शकत नाही.
दिव्यांगांचे आयुष्य सामान्यांपेक्षा फार वेगळे असते. त्यांना समाजात कधीही सामान दर्जा दिला जात नाही. त्यांना चांगली वागणूक देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अनेकदा ही बाब प्रशासनाच्या लक्षात येत नाही. सध्या असाच एका दिव्यांगांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यात बस पकडण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत आणि त्याची अवस्था पाहून अनेकांना हृदय हळहळत आहे.
हेदेखील वाचा – अटल सेतूवरील थरार! कारमधून उतरली अन् जीव देण्यासाठी मारली उडी… Video Viral
दिव्यांगांची ही अवस्था पाहून फक्त व्यवस्थाच नाही, तर तुम्ही-आम्ही सगळेच हरलो आहोत. व्हिडिओमध्ये एक अपंग व्यक्ती खड्डे पडलेल्या रस्त्यातून घसरत घसरत कसेबसे ST मध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आपल्या पायांत चप्पल असूनही आपल्याला चिखलातून चालायला आवडत नाही. हा मुलगा तर अक्षरश: या चिखलातून गुडघ्यावर चालत आहे. त्याच्या होत असलेल्या वेदना तुम्ही आम्ही समजू शकत नाही. हा संघर्ष त्याच्या वाटेला आयुष्यभरासाठी पुरलेला आहे मात्र यातून एकानेही त्याची मदत न करावी? हे पाहून फार वाईट वाटते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बसस्थानकातील दुरवस्थेवर नेटकरी प्रश्न उपस्थित करीत संताप व्यक्त करत आहेत.
या घटनेचा व्हिडिओ @lay_bhari_official नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, इथे फक्त व्यवस्थाच नाही तर तुम्ही आम्ही सर्वच हरलो असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत आपला संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले आहे, “व्हिडीओ काढण्यापेक्षा त्याला मदत केली असती तर… खूप मोठं पुण्य मिळालं असतं भावा…”