सोशल मेडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते. यातील अनेक व्हिडिओज आपल्याला अचंबित करून टाकतात. सध्या एका अटल सेतूवरील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात एका तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलोयचे दिसून येते. हा संपूर्ण थरार जवळील सीसीटीव्हीत कैद झाला असून याचाच व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. मृत्यूसाठीचा तरुणीचा हा प्रयत्न सपशेल फेल गेल्याचेही यात समजते. यांनतर महिलेने केलेला दावा ऐकून आता अनेकजण आवाक् झाले आहे.
16 ऑगस्ट रोजी शुक्रवारी हा संपूर्ण प्रकार घडून आला. मुलुंडवरून एक महिला कॅबने अटल सेतूवर आली. यानंतर 7 च्या सुमारास या महिलेने अटल सेतूवर कॅब थांबवायला सांगितली. कॅबमधून उतरताच ती रेलिंगच्या पलिकडे उभी राहिली. हा प्रकार कॅबचालकाने पाहिला. त्यामुळे त्याने प्रसांगवधान राखत महिलेला धरून ठेवले. याच काळात गस्तीवर असलेले पोलीस तिथे पोहोचले. या पोलिसांनी तिला बाहेर काढले. या सर्व घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आणि नंतर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. हा सर्व प्रकार पाहून अनेक युजर्स थक्क झाले असून तिने असे का केले असावे, आसा प्रश्न अनेकांना पडत आहे.
*ड्राइवर की बहादुरी को सलाम*
खुदकुशी करने जा रही थी महिला, ड्राइवर ने बाल पकड़ कर बचाई जान।
शुक्रवार शाम करीब 7 बजे अटल सेतु पर एक महिला ने जान देने की कोशिश की लेकिन जिस गाड़ी में महिला सफर कर रही थी उसके ड्राइवर ने सतर्कता बरतते हुए महिला की जान बचा ली। #atalsetu #Humanity pic.twitter.com/8eZGYkRIFf— Azad (@Azad99104484) August 17, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, या या महिलेचे नाव रीमा पटेल असून ती 56 वर्षांची आहे. रीमा ही मुलुंड येथील रहिवासी आहे. पोलिसांना दिलेल्या जबानीत ती देवांचे फोटो समुद्रात विसर्जित करत होती, असे तिने म्हटले आहे. अटल सेतूवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असल्याने, कंट्रोल रूमच्या अधिकाऱ्यांना महिला काही संशयास्पद करताना दिसताच त्यांनी तातडीने पेट्रोलिंग टीमला सूचना दिली.
#WATCH : Another video of Traffic Police saves woman from suicide attempt at Atal Setu Sea link Bridge connecting Mumbai and Navi Mumbai.#AtalSetu #Mumbai #NaviMumbai #SuicideAttempt #NhavaShevaTrafficPolice pic.twitter.com/UkANQdTtSu
— upuknews (@upuknews1) August 17, 2024
सूचना मिळताच लगेचच चार कर्मचाऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. त्या अधिकाऱ्यांची कार तेथे पोहोचताच त्या महिलेने समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण तेथे उभ्या असलेल्या कॅब ड्रायव्हरने लगेच तिच्या केस पकडून तिला धरून ठेवले अन् तिचा हातही पकडला. यांनतर महिलेला वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी रोलिंगवर चढून महिलेचा जीव वाचवला.
हेदेखील वाचा – शाळा बनली आखाडा! चालू वर्गात पुरुष अन् महिला शिक्षकांत हाणामारी, विद्यार्थी आवाक्, Video Viral
दरम्यान, याबाबत न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गुलफरोज मुजावर म्हणाले, “आमची पेट्रोलिंग व्हॅन त्याच रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना उभी केलेली कार दिसली. तसेच, शेलार टोल नाक्याच्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पुलावर एक कार थांबलेली आणि एक महिला रेलिंगवर उभी असल्याचे दिसल्याने त्यांनी पोलिस पथकाला सतर्क केले होते.” पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल यांच्या एका नातेवाईकाने त्यांना सांगितले की, ती अपत्यहीन असल्याने काही दिवसांपासून ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. घटनेच्या वेळी तिचा पती पुण्यात होता, अशी माहिती पोलिसांनी देण्यात आली आहे.