Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेट्रोमध्ये अचानक बॅगेतून पडले डझनभर साप; प्रवासी घाबरले नाही तर एकेएकाने पकडायला केली सुरुवात; Video Viral

Snake Video Viral : अरे बापरे... डझनभर साप मेट्रोच्या फर्शीवर पडले पण प्रवाशांना अजिबात वाटली नाही भिती. चीनमध्ये घडलेला हा प्रकार सध्या चांगलाच चर्चेत असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वांना थक्क करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2026 | 09:08 AM
मेट्रोमध्ये अचानक बॅगेतून पडले डझनभर साप; प्रवासी घाबरले नाही तर एकेएकाने पकडायला केली सुरुवात; Video Viral

मेट्रोमध्ये अचानक बॅगेतून पडले डझनभर साप; प्रवासी घाबरले नाही तर एकेएकाने पकडायला केली सुरुवात; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मेट्रोमध्ये बॅगेतून डझनभर जिवंत साप फर्शीवर पडले.
  • प्रवाशांनी न घाबरता साप पकडून मदत केली.
  • व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल.
साप हा एक विषारी प्राणी असला तरी सापाच्या सर्वच प्रजाती काही विषारी नसतात. भारतात सापांचे भय फार आहे पण बाहेरील काही देशांमध्ये सापाच्या सर्वच प्रजातींना धोकादायक मानले जात नाही. भारताचा शेजारील देश चीनमध्ये तर सापांना शिजवून देखील खाल्ले जाते. अशात चीनमधीलच एक व्हिडिओ अलिकडे इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात रेल्वेतील एक घटना दाखवण्यात आली. चीनच्या मेट्रोत प्रवास करताना एका व्यक्तीच्या बॅगेतून असंख्य साप रेल्वेच्या फर्शीवर पडले आणि ते इकडे-तिकडे धावू लागले. आता भारतात जर अशी घटना घडली असती तर निश्चितच रेल्वेच्या डब्यात गोंधळ उडाला असता परंतु चीनच्या मेट्रोत दृष्य काही वेगळेच होते. सापांना सरपटताना पाहून चीनच्या मेट्रोतील लोक घाबरले नाही तर अनेक प्रवाशांनी पुढाकार घेत सापांना आपल्या हाताने पकडून देण्यास मदत केली.

५८ लाखांचं पॅकेज, घर-गाडी सगळं तरीही मुलगा मिळेना… चीनच्या ‘वधू बाजारात’ हंबरडा फोडून रडू लागली महिला; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

चायना पल्सने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, एक प्रवासी सबवेच्या फरशीवरून साप गोळा करताना दिसून आला. यावेळी मेट्रोच्या फरशीवर एक किंवा दोन नाही तर डझनभर जिवंत साप सरपटत असतात. मुख्य म्हणजे इतक्या सापांना पाहूनही एकही प्रवासी घाबरत नाही. सर्वजण फार शांतपणे बसलेले असते. पुढे जेव्हा साप सरपटत पळून जाण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा काही प्रवासी उठून त्या सापांना पकडू लागतात. प्रवासी व्यक्तीची मदत करतात आणि सरपटणाऱ्या सापांना आपल्या हाताने पकडून व्यक्तीच्या स्वाधीन करतात. व्हिडिओतील हे दृष्य पाहून सोशल मिडिया यूजर्स चांगलेच हादरले आहेत. जिथे सापांना पाहून आपली हवा टाईट होते तिथेच सापांना फार सामान्यपणे हाताळले जात आहे हे पाहून अनेकजण थक्क झाले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून या घटनेमुळे सार्वजनिक वाहतुकीतून जिवंत प्राणी वाहून नेण्याबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.

Snakes escape man’s bucket in Chinese metro No one is screaming or panicking, but helping pic.twitter.com/TrHFoSSMdc — RTVisual (@RT_Visual_on_X) August 19, 2026

कुकरच्या शिट्टीत लपवलं १ कोटींचं सोनं; दिल्ली विमानतळावर प्रवाशाचा भांडाफोड; Video Viral

दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @@RT_Visual_on_X नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “अमेरिकन रेस्टॉरंटपेक्षा चिनी मेट्रो अधिक स्वच्छ दिसत आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते साप नाहीत रे भावा. ते ‘ईल्स’ (eels) आहेत – ‘राईस ईल्स’. शेतकऱ्याच्या हातून चुकून त्या बादल्या उलटल्या आणि ते सगळं खाली सांडलं. जर ते साप असते, तर लोक नक्कीच घाबरले असते”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “चीनमध्ये लोकांना सापाची नाही तर सापाला लोकांची भिती वाटते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: China metro dozens of snakes fall from passenger bag viral video prank incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • China
  • snake viral video
  • viral news

संबंधित बातम्या

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
1

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

Asian Games 2026 : Bye Bye Japan, 20 व्या आशियाई स्पर्धेची सांगता, आता ‘या’वर्षी दोहामध्ये  रंगणार स्पर्धा
2

Asian Games 2026 : Bye Bye Japan, 20 व्या आशियाई स्पर्धेची सांगता, आता ‘या’वर्षी दोहामध्ये रंगणार स्पर्धा

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
3

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
4

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.