नदीत मगरींच्या विळख्यात अडकला झेब्रा, मृत्यू अटळ होता पण शेवटी घडलं असं... पाहूनच व्हाल हैराण; Video Viral
सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसून आला आहे. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते त्यातच आता इथे थक्क करणारी घटना व्हायरल झाली आहे. यात एक झेब्रा नदीत मगरीच्या घोळक्यात अडकल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून आता त्याचा मृत्यू निश्चितच होणार असे वाटते मात्र शेवट असा घडतो की पाहून सर्वच अचंबित होऊन जातात. व्हिडिओत नक्की असे काय घडते ते जाणून घेऊयात.
जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये मगरीच्या विशेषरित्या समावेश होतो. पाण्याच्या आत मगरीपेक्षा मोठा शिकारी असू शकत नाही. आपल्या थरारक शिकारीमुळे तिला पाण्याचा राक्षस म्हटले जाते. मगरीच्या जबड्यात कोणताही माणूस किंवा प्राणी अडकला की त्याला मृत्यूनंतरच मुक्ती मिळते. पण करिष्मा या जगात कधीही होऊ शकतो. असाच एक करिष्मा या व्हिडिओत घडल्याचे दिसून आले. व्हिडिओतील दृश्ये फार मनोरंजक आणि हैराण करणारी आहेत. खरंतर व्हिडिओ पाहताना आता झेब्राचे काय खरे नाही असेच सर्वांना वाटते मात्र याचा शेवट असे काही वळण घेतो की पाहून सर्वच थक्क होतात.
काय घडले व्हिडिओत?
नदीत मगरींच्या समूहाने झेब्रा घेरल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मगरींपैकी एक झेब्रावर सतत हल्ला करत आहे आणि त्याला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मगरीच्या सततच्या हल्ल्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी झेब्रा दातांनी आपला जबडा पकडतो. झेब्रा मगरीला दातांनी घट्ट पकडतो. इथे इतर काही मगरीही त्या झेब्रावर सतत हल्ला करत होत्या. पण या सर्वांपासून स्वतःला वाचवत झेब्रा जीव वाचवण्यासाठी नदीतून पळून जातो. व्हिडिओतील सर्वात धक्कादायक क्षण म्हणजे झेब्राने जीव वाचवण्यासाठी मगरीचा जबडा त्याच्या दाताने पकडला, ज्यामुळे त्याचे प्राण वाचले.
That zebra bit the damn croc 🤯 pic.twitter.com/EcUCNHTv11
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) January 8, 2025
तरुणींमध्ये झाला तुफान राडा, एकमेकींच्या झिंझ्या उपटत जमिनीवर आपटले अन् हाणामारीचा Video Viral
हा मजेदार व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, ‘त्या झेब्राने मगरीला चावा घेतला’ असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 14 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “झेब्रा सिंहांशीही लढू शकतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जगण्याची इच्छा प्रत्येक सजीवामध्ये असते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.