Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रंग उडवला म्हणून रागावली अन् आज्जीनेच स्वतःच्या नातवावर टाकलं उकळतं पाणी, चिमुकल्याचा आक्रोश अन् धक्कादायक Video Viral

Nagpur Incident Video : आज्जीच नातवाच्या जीवावर उठली? पिचकारीने रंग उडवला म्हणून 4 वर्षांच्या नातवावर ओतलं उकळत पाणी... घटनेचे फुटेज व्हायरल होताच पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 05, 2026 | 10:33 AM
रंग उडवला म्हणून रागावली अन् आज्जीनेच स्वतःच्या नातवावर टाकलं उकळतं पाणी, चिमुकल्याचा आक्रोश अन् धक्कादायक Video Viral

रंग उडवला म्हणून रागावली अन् आज्जीनेच स्वतःच्या नातवावर टाकलं उकळतं पाणी, चिमुकल्याचा आक्रोश अन् धक्कादायक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • नागपूरमध्ये नातवाने पिचकारीने आज्जीवर रंग टाकल्याने अचानक वाद निर्माण झाला.
  • संतापलेल्या आज्जीने हातातील गरम पाण्याची बादली थेट मुलाच्या अंगावर ओतली.
  • या घटनेत मुलगा गंभीररीत्या भाजला असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
होळी हा रंगांचा सण असून एकमेकांवर रंग उडवून हा सण साजरा केला जातो. देशभर होळीच्या सणाचा उत्साह काही वेगळाच असतो. अशातच अलिकडे होळी दरम्यान घडून आलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात आहे. घटना नागपूरची असून इथे आज्जीच आपल्या नातवाच्या जीवावर उठल्याचे दृष्य दिसून आले. नातवाने होळी सणानिमित्त आज्जीवर रंग उडवला पण आज्जी अशी भडकली की तिने थेट उकळत्या पाण्याची बादली नातवाच्या अंगावर टाकली. यामुळे मुलाचे शरीर गंभीररित्या भाजले असून घटनेचे फुटेज आता संपूर्ण इंटरनेटवर जोरदार शेअर केले जात आहे. चला घटनेविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

एक चूक पडली महागात! तारेवर चढताच सापाला लागला विजेचा झटका अन् मग जे घडलं… घटनेचा Video Viral

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाचे नाव ओम असून तो होळीनिमित्त पिचकारीने खेळत होता. यावेळी त्याला त्याची आज्जी घरात जाताना दिसली ज्यानंतर त्याने पिचकारीने त्याच्या आज्जीवर रंग उडवला. आज्जीला त्याचे हे वागणे आवडले नाही आणि तिने थेट हातात असलेल्या गरम पाण्याची बादली नातवाच्या अंगावर ओतली. व्हिडिओत ही सर्व घटना आपल्याला स्पष्टपणे घडताना दिसते. गरम पाणी अंगावर पडताच मुलगा मोठ्याने ओरडू लागतो. त्याचे रडने ऐकूण बाजूल्या उभ्या असलेल्या महिलेने आपल्या बादलीतील पाणी त्याच्या अंगावर टाकले. चूक लक्षात येताच आज्जीनेही थंड पाण्याची बादली मुलाच्या अंगावर टाकली.

माहितीनुसार, या घटनेत मुलीचे कमरेखालील शरीर गंभीररित्या भाजले असून डाॅक्टरांचे म्हणणे आहे की, या घटनेत मुलगा जवळपास 45 टक्के भाजला गेला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच आता पोलिसांनी चाैकशी सुरु केली आहे. नेटकऱ्यांकडून मात्र आज्जीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

हा तर मोगलीचा भाऊ निघाला! खाली खोल दरी; तरीही झाडांवरून मारतोय थरारक उड्या… पाहणारेही झाले चकित; Video Viral

घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक यूजर्सने या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की या महिलेवर कठोर कारवाई होईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा व्हिडिओ खूपच वेदनादायक आहे पण मला वाटतं कदाचित ही महिला बादलीत गरम पाणी आहे हे विसरली असेल आणि तिने ते पाणी मुलावर ओतलं असेल. पण तिला ते कळताच तिने काळ्या बादलीतून थंड पाणी ओतलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अगदी भयानक! एका मुलाच्या निष्पाप होळीच्या उत्सवात इतक्या क्रूरतेचा सामना करावा लागला? रंगांशी खेळण्यासाठी एका लहान मुलावर उकळते पाणी फेकणे हा एक घृणास्पद गुन्हा आहे. अधिकाऱ्यांनी या महिलेविरुद्ध तात्काळ आणि कठोर कारवाई करावी”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Nagpur incident grandma poured boiling water on her 4 year old grandson viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • Nagpur
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral
1

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral
2

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral

मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral
3

मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral

तुझा का माझा… अंत्यसंस्कारावेळी दोन माशूकांमध्ये सुरु झाली लढाई, शवपेटीवरचं केला लाथाबुक्यांचा मारा; पहा Viral Video
4

तुझा का माझा… अंत्यसंस्कारावेळी दोन माशूकांमध्ये सुरु झाली लढाई, शवपेटीवरचं केला लाथाबुक्यांचा मारा; पहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.