Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटी आईच ती…! मृत्यू समोर उभा होता पण हत्तीणीला चिंता तिच्या बाळाची, शेवटपर्यंत उठली नाही, पाहून सर्वच झाले भावुक; Video Viral

Heart Touching Video : आईच्या मायेची मृत्यूशी झुंज! शेवटपर्यंत कळवळत राहिली पण मुलाला आपल्यापासून केले नाही दूर. मादी हत्ती आणि तिच्या मुलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून यातील दृश्ये सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणत आहे

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 16, 2025 | 03:01 PM
शेवटी आईच ती...! मृत्यू समोर उभा होता पण हत्तीणीला चिंता तिच्या बाळाची, शेवटपर्यंत उठली नाही, पाहून सर्वच झाले भावुक; Video Viral

शेवटी आईच ती...! मृत्यू समोर उभा होता पण हत्तीणीला चिंता तिच्या बाळाची, शेवटपर्यंत उठली नाही, पाहून सर्वच झाले भावुक; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

या जगात सर्वात निस्वार्थी प्रेम करणारी कोणती व्यक्ती जर आपल्या आयुष्यात असेल तर ती म्हणजे आपली आई असते. जन्माआधीपासूनच ती पोटात असतानाच ती आपली पुरेपूर काळजी घेते. आपल्या बाळाला काही होणार तर नाही ना, याची चिंता तिला क्षणोक्षणी लागलेली असते. ममतेचे सागर म्हणून ओळखली जाणारी आई वेळ आली तर आपल्या मुलासाठी ढाल बनूनही तयार राहते. आईची ही माया फक्त माणसांमध्येच नाही तर इतर सजीवांमध्येही तितकीच प्रगल्भ असते, हेच पटवून देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एक हत्तीण मृत्यूला झुंझ देताना दिसून आली, तिच्या वेदना व्हिडिओत स्पष्ट दिसून येत होत्या पण आपल्याला होणाऱ्या त्रासाला बाजूला सारून तिची तळमळ आपल्या मुलाला पाहण्यात जास्त दिसून येत होती.

एका भक्ष्यामागे लागले अनेक शिकारी, खाण्याची वाटणी सुरूच होती तितक्यात सिंहाने बदलला खेळ; शिकारीचे थरारक दृश्ये अन् Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हत्तीणी कशी जमिनीत रुतली गेली आहे. तो यावेळी फार खूप कमकुवत आणि असहाय्य झालेली दिसते. तिचे आयुष्य जास्त काळ टिकणार नाही हे स्पष्ट आहे, परंतु या परिस्थितीतही ती स्वतःला विसरून तिच्या बाळाची काळजी करू लागली आणि तिला तिच्या सोंडेने गुंडाळले. बाळ हत्ती उठू शकत नसल्याने, मादी हत्तीणीला त्याची जास्त काळजी वाटत होती आणि ती त्याला वाचवू इच्छित होती. जणू ती तिच्या मुलाला सांगत होती की ‘काळजी करू नकोस, मी इथे आहे’. हे दृश्य इतके हृदयस्पर्शी आहे की पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना पाणी येते. माहितीनुसार, नंतर हत्तिणी आणि तिच्या मुलाला यशस्वीरीत्या वाचवण्यात आले.

बैलाचा माणसावर भयंकर हल्ला, आधी शिंगांनी हवेत उडवलं मग पायाने तुडवलं; घाबरून लपला गाडीच्या खाली अन्… Video Viral

हा हृदयस्पर्शी व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @wildfriends_africa नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “देवाचे आभार, ती वाचली. हत्ती किती सुंदर आत्मा आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “देवाचे आभार की ती आणि तिचे बाळ वाचले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मी तिला सोडवण्यासाठी माझ्या हातांनी खोदायला सुरुवात केली असती. सुदैवाने आई आणि तिच्या बाळाला मदत करण्यासाठी योग्य लोक आले.”

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Death was close but mother elephant still worried about her baby heart touching video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • Elephant Video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

एका भक्ष्यामागे लागले अनेक शिकारी, खाण्याची वाटणी सुरूच होती तितक्यात सिंहाने बदलला खेळ; शिकारीचे थरारक दृश्ये अन् Video Viral
1

एका भक्ष्यामागे लागले अनेक शिकारी, खाण्याची वाटणी सुरूच होती तितक्यात सिंहाने बदलला खेळ; शिकारीचे थरारक दृश्ये अन् Video Viral

बैलाचा माणसावर भयंकर हल्ला, आधी शिंगांनी हवेत उडवलं मग पायाने तुडवलं; घाबरून लपला गाडीच्या खाली अन्… Video Viral
2

बैलाचा माणसावर भयंकर हल्ला, आधी शिंगांनी हवेत उडवलं मग पायाने तुडवलं; घाबरून लपला गाडीच्या खाली अन्… Video Viral

चिमुकल्या हत्तीला एकटं पाहताच जंगलाच्या राजा-राणीने एकत्र मिळून केला हल्ला, खाणार तितक्यात आई आली अन् असा दणका दिला; Video Viral
3

चिमुकल्या हत्तीला एकटं पाहताच जंगलाच्या राजा-राणीने एकत्र मिळून केला हल्ला, खाणार तितक्यात आई आली अन् असा दणका दिला; Video Viral

Indore मध्ये मृत्यूचे भीषण तांडव! एक ट्रक वेगाने आला अन् असंख्य लोकांना…; पहा Viral Video
4

Indore मध्ये मृत्यूचे भीषण तांडव! एक ट्रक वेगाने आला अन् असंख्य लोकांना…; पहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.