

तुम्ही अविवाहित असूनही तुमचे छंद अजूनही नवाबींसारखे आहेत का?
विजेच्या बिलाचाही मोठा वाटा असतो
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या
Viral Video : आजकाल दिल्ली-एनसीआरसारख्या मोठ्या शहरात एकटे राहणे खूप खर्चिक झाले आहे. विशेषतः जर तुम्ही मोठे घर सांभाळत असाल आणि तिथूनच काम करत असाल तर. नुकत्याच एका 24 वर्षीय कंटेंट क्रिएटरने तिच्या जीवनशैलीचा एक व्हिडिओची झलक शेअर केली आहे. या व्हिडिओत तिने तिच्या महिन्याच्या खर्चाचा तपशील दिला आहे. घराचे भाडे आणि विजेच्या बिलांपासून ते किराणा सामान आणि मोलकरणींपर्यंत तिने प्रत्येक गोष्टीचा तपशील या व्हिडिओ मार्फत दिला आहे.
तिच्या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटले आहे की, ती दिल्लीच्या घरात एकटी राहत असूनही हे घर मोठे 3 बीएचके फ्लॅट का विकत घेतला, यावर भाष्य केले. तिने स्पष्टपणे सांगितले, "सर्वात आधी, कृपया माझ्यावर रागावू नका. मी 3 बीएचकेमध्ये राहते कारण हे माझे घर आहे, हे माझे ऑफिस आहे आणि हे माझ्या ब्रँडचे ऑफिस आहे; सर्व काही येथूनच चालते."
त्या क्रिएटरने सांगितले की ती एका उंच इमारतीमधील सेमी-फर्निश्ड अपार्टमेंटमध्ये राहते, ज्याचे मासिक भाडे सुमारे ६१,००० रुपये आहे. घरातील बहुतेक फर्निचर भाड्याने घेतलेले आहे, विकत घेतलेले नाही. ती फर्लेंकोकडून सोफे, टेबल, बेड आणि गाद्यांसहित सर्व काही भाड्याने घेते आणि त्यासाठी दरमहा सुमारे 8500 देते
खर्चाच्या या यादीत विजेच्या बिलाचाही मोठा वाटा असतो, विशेषतः उन्हाळ्याच्या ऐन दिवसांत. तिच्या मते, जेव्हा एसी सतत चालू असतो, तेव्हा विजेचे बिल 45000 पर्यंत पोहोचू शकते. मात्र, हिवाळ्यात ते सुमारे 2000 पर्यंत कमी होते. शिवाय, तिचे मासिक गॅस बिल 1500 ते 2000 च्या दरम्यान असते, तर ती वाय-फायसाठी सुमारे 1000 देते.
घरातील कामे, स्वयंपाक आणि साफसफाईसाठी ती अर्धवेळ मोलकरणीला कामावर ठेवते. ती तिला दरमहा 7000 पगार देते. तसेच, ती आपली गाडी रोज स्वच्छ करण्यासाठी दरमहा 800 खर्च करते.
किराणा आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत, पीठ, तांदूळ आणि पोहे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंवरील तिचा मासिक खर्च सुमारे 4000 ते 5000 येतो. तथापि, तिने कबूल केले की याव्यतिरिक्त इतरही अनेक छोटे खर्च आहेत, ज्यांचा ती हिशोब ठेवत नाही. ती हसून म्हणाली की, ब्लिंकइटवरून दररोज आणि साप्ताहिक मागवल्या जाणाऱ्या वस्तूंची नोंद तपासण्याचे धाडस तिच्यात नाही.
तिच्या सर्व खर्चांची बेरीज केल्यास, तिच्या रोजच्या ऑनलाइन खरेदीचा खर्च वगळता, हिवाळ्यातही तिचा एकूण मासिक खर्च सुमारे 58800 ते 90300 येतो. वाढत्या वीज बिलांमुळे उन्हाळ्याच्या ऐन हंगामात हा आकडा आणखी वाढतो.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली की एका व्यक्तीसाठी हा खर्च खूप जास्त आहे. दुसऱ्याने तिची प्रशंसा करत लिहिले, "तू हे सर्व एकटीच सांभाळत आहेस! अप्रतिम." तिसऱ्या युझर्सने प्रश्न विचारला, "एका व्यक्तीला ३ बीएचके घराची काय गरज आहे?"