वृद्ध आजी-आजोबांना कंडक्टरने बसमधून खाली उतरवलं ; कंडक्टरचा संतापजनक Video Viral
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आताही इथे एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे. चर्चेचा विषय ठरलेला हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की शेवटी कंडक्टरला आपला जॉब गमवावा लागला. त्याच्या एका कृतीने सोशल मीडियावर टीकेचा पाऊस पडला आणि आता यात काय घडले ते चला आपण सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
ही घटना नंदुरबारच्या शिरपूर आगारामध्ये घडून आली. शिरपूर आगारातील एका बस कंडक्टरच्या उद्धट वागणुकीमुळे एक वृद्ध जोडपं अपमानित झालं. बस कंडक्टरचे हे वर्तन एकाने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केलं आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर होणार काय… लोकांनी हा व्हिडिओ जोरदार शेअर केला आणि काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध आजी-आजोबा ज्या बसने प्रवास करत होते ती बस मध्येच बंद पडली. त्यानंतर त्यांनी शिरपूर आगारातील दुसऱ्या बसमध्ये बसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बसमधील कंडक्टरने त्यांना बसमध्ये चढू दिलं नाही. आजी-आजोबा बसमध्ये चढत असताना कंडक्टर म्हणाला, “ओ आजी, चला ना… कसं समजत नाही तुम्हाला? गाडी खाली असती तर चाललं असतं, पण बघा ना किती लोड आहे!” या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला असून त्यात कंडक्टर वृद्ध दांपत्याला बसमधून उतरवताना आणि त्यांच्याशी उद्धटपणे वागताना दिसतो. एवढंच नाही, तर कंडक्टरने म्हटलं, “हे फुकट प्रवास करणारे लोक आहेत. अधिकारी असते तर वेगळी गोष्ट असती.”
या संपूर्ण प्रकारामुळे कंडक्टरविरुद्ध आता लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लोक कंडक्टरवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहेत. एक साधं वृद्ध जोडपं, ज्यांची बस बंद पडली, त्यांनी दुसऱ्या बसमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला, पण त्यांना जागा नाही म्हणून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे, असं अनेकांचं मत आहे. घटनेचा व्हिडिओ @_s.m.t.v_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर कंडक्टरला निलंबित केले असल्याची माहिती कमेंट सेक्शनमध्ये देण्यात आली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.