जीवनाला कंटाळली सिंहीण थेट देवाला गेली शरण... पाण्यात बसून एकटक बघत राहिली, हाथ जोडले अन्... मजेदार Video Viral
सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक अजब-गजब आणि सुंदर व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ आपल्याला प्राण्यांविषयी आणि त्यांच्या आयुष्याविषयी जवळून जाणून घेण्याची संधी मिळवून देतात. इथे अनेकअसे दृश्य शेअर केले जातात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल आणि असाच एक क्युट आणि कधीही न पाहिलेला व्हिडिओ नुकताच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक सिंहीण नदीत बसून एकटक समोर पाहत असल्याचे दिसते, ती शांत असते आणि कॅमेरा अँगल बदलताच आपल्याला समोर भगवान शंकराची प्रतिमा दिसून येते. थकलेली सिंहीण शंकराकडे बघत असते जे पाहून ती देखील देवाकडे प्रार्थना करायला आली आहे असा अंदाज युजर्स लावू लागतात. नेहमी शिकार करताना दिसणारी सिंहीण देवाचरणी लीण झाल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि लोकांनी हा व्हिडिओ वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यातील दृश्ये पाहून कुणालाही क्षणभर आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. जंगलातील रौद्र रूप धारण करणारी आणि शिकारीसाठी ओळखली जाणारी सिंहीण इतक्या शांतपणे देवापुढे शरणागत झाल्यासारखी दिसते, हे खरोखरच अविश्वसनीय आहे. व्हिडिओमध्ये दिसते की सिंहीण एका मंदिरासमोरच्या पाण्यात निवांत बसलेली आहे. तिच्या डोळ्यांत एक वेगळीच भावमुद्रा दिसून येते. जणू ती जीवनातील संघर्षांना कंटाळून देवाकडे शरण आली आहे.
या अनोख्या प्रसंगाने प्रेक्षक भावुक झाले आहेत. काहींनी या व्हिडिओला “प्रकृती आणि श्रद्धेचे अद्भुत मिलन” असे म्हटले आहे. तर काहींनी याला जीवनातील वास्तवाशी जोडले. हा व्हिडिओ @chanaamasalaa नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तू ठीक आहेस का सिंहीण? कॉल करू” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वाटतंय सिंहीण पण सध्या घाट्यात चालत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सिंहिणीला कोणती समस्या सतावत असेल”.
खरं तर, हा व्हिडिओ फक्त मनोरंजनापुरता नाही तर त्यामागे एक संदेशही दडलेला आहे, की निसर्गातील प्रत्येक सजीवाला श्रद्धेची आणि शांततेची गरज असते. जीवनात कितीही संकटे आली तरी देवावर विश्वास ठेवला, तर मनःशांती नक्कीच मिळते.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.