झेरॉक्सच्या दुकानाबाहेर मालकाने लावली अशी पाटी...पाहून सर्वच दंग, मार्केटिंगची हटके आयडिया पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
आपला व्यवसाय मोठा व्हावा आणि खरेदी वाढावी अशी प्रत्येक दुकानदाराची इच्छा असते आणि यासाठी अनेक दुकानदार आपल्या दुकानाबाहेर वेगवगेळ्या पाट्या किंवा जाहिराती लावत असतात. याद्वारे ते ग्राहकांना आपल्या दुकानाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. कोणत्याही व्यवसायासाठी त्याची मार्केटिंग स्टाइल अधिक महत्त्वाची असते. तुम्ही आतापर्यंत दुकानाबाहेर लावलेल्या अनेक पाट्या किंवा पोस्टर पाहिले असतील मात्र सध्या दुकानाबाहेरची जी पाटी वायरल होत आहे अशी पाटी तुम्ही मुळातच कुठे पाहिली असावी.
सध्या सोशल मीडियावर एका झेरॉक्स दुकानाबाहेर लावलेली एक अनोखी पाटी फार वेगाने व्हायरल होत आहे. याचा फोटो पाहून आता अनेकजण याची मजा लुटत आहे. पुणेकर आपल्या स्वभावासाठी आणि त्यांच्या अनोख्या पाट्यांसाठी देशभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ही पाटीदेखील पुण्याचीच असावी असा अंदाज आता नेटकरी लावत आहेत. मात्र ही व्हायरल पाटी नेहमी कुठली आहे हे अद्याप समाजलेले नाही. या पाटीवर नक्की काय लिहिले आहे ते जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – Video Viral: गवत चरताना गाईसमोर अचानक आला कोब्रा, फणा काढून उभा राहिला मग गाईने जे केले…पाहून दंग व्हाल
आता पाटीबाबतची एवढी चर्चा पाहून तुम्हीही म्हणाल नक्की या पाटीवर असे काय लिहिले आहे? तर आम्ही तुम्हाला सांगतो झेरॉक्सच्या दुकानाबाहेरील पाटीवर लिहिले आहे, “कॅनन झेरॉक्स डोळ्याची पापणी उघडण्याच्या आत काढून मिळेल. ” आता आपल्या सर्वांनाच माहिती असेल की मुख्यतः झेरॉक्सच्या दुकानाबाहेर फार गर्दी असते. त्यातही हे झेरॉक्सचे दुकान जागोजागी उपलब्ध असल्याने अनेकजण आपला वेळ वाचवण्यासाठी कमी गर्दी किंवा पटकन जिथे झेरॉक्स मिळेल अशा जागी जायला बघतात. याकडेच लक्ष देत आता या दुकानदाराने आपल्या दुकानाबाहेर ही हटके पाटी लावली आहे. दुकानदाराच्या या आयडियाची आता अनेकजण कौतुक करत आहेत.
हेदेखील वाचा –Video Viral: व्यक्तीच्या पँटमधून बाहेर निघाला किंग कोब्रा, पाहून सर्वच दंग, लोक म्हणाले, “हा आत गेला कसा? “
पाटीचा हा व्हायरल व्हिडिओ @editor_sonu_xx नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, “आता हे काय म्हणण्याचं ” असं लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “अरे केहणा क्या चाहते हो, काय काढून देणार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सर्वात स्लो तर कॅनन च प्रिंटर आहे”.