कोब्रा हा जगातील सर्वात विषारी आणि धोकादायक सापांमध्ये गणला जातो. जर तो एखाद्याला चावला त्याचे जिवंत राहणे काठीन होऊन बसते. कोब्राला पाहताच प्राणीच काय तर माणसची उलटे पाय घेऊन पळू लागतात. कोब्राचे अनेक थरारक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर कोब्राचा एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. यातील दृश्ये पाहून तुम्ही दंग व्हाल.
व्हिडिओमध्ये दोन पुरुष एका माणसाच्या पँटमधून चक्क कोब्रा बाहेर काढताना दिसत आहेत. ही घटना थायलंडमधील एका शाळेत ही घटना घडली आहे. जिथे विद्यार्थ्यांसाठी ‘डेमो’ कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक एका शिक्षकाच्या पँटमधून कोब्रा बाहेर बाहेर काढला. या व्हिडिओमध्ये तुम्ही एका माणसाच्या पँटमधून कोब्रा बाहेर काढताना पाहू शकता. यात दिसते की, दोन माणसे पायजवळच्या पँटमध्ये हात घालून सापाला सहज बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तो त्याच्या प्रयत्नात यशस्वी होतो, जिथे एक व्यक्ती सापाचे तोंड दाबून त्याला बाहेर काढते. मग दुसरी व्यक्ती त्याचे शरीर हातात धरते.
हेदेखील वाचा – मित्राच्या तिकिटावर एका रात्रीत बनला करोडपती! जिंकले 25 कोटी, कर्नाटकच्या स्कुटर मेकॅनिकची कहाणी ऐकली का?
व्हायरल व्हिडिओतील हा थरार पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. तसेच हा कोब्रा नक्की या माणसाच्या पँटीत आला कसा? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. थायलंडमधील स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, दरवर्षी 70,000 लोकांवर गोवर आजारासाठी उपचार केले जातात आणि किमान 30 लोकांचा मृत्यू होतो. या अपघातांचे मुख्य कारण म्हणजे कोब्रा साप. म्हणूनच हा डेमो कार्यक्रम आयोजित केला असावा.
हेदेखील वाचा – Viral Video: बाइकवर फिरताना अचानक समोर आला भयावह प्राणी, तरुणांचा उडाला थरकाप, पाहूनच अंगावर काटा येईल
हा व्हायरल व्हिडिओ @indypersian नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपले मतदेखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, हे कसे शक्य आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याच्या पँटच्या आत नक्की हा कोब्रा काय करत होता” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आता प्रश्न असा निर्माण झालाय की हा कोब्रा नक्की पँटीत गेला कसा”.