रील बनवण्यासाठी लोकांसमोर ठुमके मारू लागली तरुणी, आईने पाहताच असा दिला चोप, पाहून तुमचेही उडतील होश; Video Viral
आजकाल लोक रील बनवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काही लोक रस्त्यावर नाचण्यास किंवा धोकादायक स्टंट करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. पण, त्याच्या कुटुंबीयांनाही या कृती आवडतीलच असे नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी इंस्टाग्राम रीलसाठी व्हिडिओ बनवत आहे. मात्र यानंतर मागून तिची आई येते आणि भररस्त्यात तिला मारायला तिच्या मागे धावते. हा सर्व प्रकार आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक आता या व्हिडिओची फार मजा घेत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलवार ड्रेस घातलेली एक मुलगी गर्दीसमोर नाचत आहे. अनेक लोक त्यांच्या फोनमध्ये तिचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. यात मुलगी बेधुंद होऊन नाचताना दिसते. मात्र पुढच्याच क्षणी असे काही घडते की पाहून सर्वच थक्क होतात. मुलगी नाचण्यात मग्न असतानाच मागून तिची आई येते आणि आपल्या मुलीचा हा सर्व प्रकार पाहून ती भडकते. यानंतर काय घडते याचा तुम्ही विचार करू शकता.
आपल्या मुलीला लोकांसमोर नाचताना पाहून तिची आई लगेच तिच्याजवळ जात तिला मारहाण करण्यासाठी तिच्या जवळ जाते. मुलीला थप्पड लागताच ती घाबरून तेथून पळून जाते. हा 10 सेकंदाचा व्हिडीओ ज्या कोणी पाहिला त्याला हसू आवरता आले नाही. याचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
Slap-Kalesh b/w Mom and Daughter over Recording insta reels while dancing in crowd: pic.twitter.com/0jrKEQkDjB
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 10, 2025
या व्हिडिओवर लोकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत तर काही लोकांनी रस्त्यावरील गर्दीसमोर महिलेने असा डान्स करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे कलेश नाही.. ते तुमच्या मुलांना नैतिकता शिकवत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे,”आईसाठी मान आणखीन वाढला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.