(फोटो सौजन्य: instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक निरनिराळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात कधी लोकांचे अनोखे जुगाड व्हायरल होतात, कधी थरारक स्टंट्स तर कधी अंगावर काटा आणणाऱ्या काही घटना. तसेच इथे प्राण्यांच्या जीवनाशी निगडित देखील काही व्हिडिओज शेअर केले जातात. सध्या देखील इथे असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात बिबट्याच्या एका थरारक शिकारीचे दृश्य दिसून येत आहेत ज्याला पाहून सोशल मीडिया युजर्स हैराण झाले आहेत.
सोशल मीडियावर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बिबट्याच्या शिकारीचा एक अनोखा थरार दिसून आला. आजवर सोशल मीडियावर शिकारीचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत त्यातच आता यात आणखीन एका व्हिडिओची भर पडली आहे. बिबट्याच्या या शिकारीला पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी बिबटा हा एक प्राणी आहे. त्याच्या वेगामुळे तो काही क्षणातच आपल्या शिकाऱ्यावर हल्ला करतो आणि काही समजायच्या आतच त्याला मृत्यूच्या दारी पोहचवतो. आताच्या व्हिडिओतही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले आहे.
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या रीलमध्ये बिबट्याने आधी कुत्र्याची मान पकडली आणि नंतर त्याची ताकद आणि वेग दाखवत त्याला तेथून पळवून नेल्याचे पाहायला मिळत आहे. ही संपूर्ण घटना एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली, जी आता लोकांमध्ये व्हायरल होत आहे. या संपूर्ण व्हिडिओतील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिबट्याने कुत्र्याला स्वतःला वाचवण्याची एक संधीही दिली नाही आणि आपले काम पूर्ण केले. यातील दृश्ये आता अनेकांना हैराण करत आहेत.
बिबट्याच्या शिकारीचा हा ठरणार @rudraprayag_sanatani नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हा व्हिडीओ पोस्ट करण्यामागचा उद्देश लोकांना जागृत करणे हा एक अतिशय दुःखद दृश्य आहे. आणि ही देखील मोठी चिंतेची बाब आहे. आपण जंगलांना आग लावत आहोत, प्राणी नामशेष होत आहेत आणि उरलेल्या पक्ष्यांची शिकार करत आहोत. वन्य प्राण्यांना शिकारीसाठी वस्तीवर यावे लागते. मलाही कुत्र्याला वाचवायचे होते पण ते शक्य झाले नाही आणि वाघाला उपाशी मरणे योग्य आहे का? बाकी कुत्रे प्रेमी कमेंट्स सेक्शनमध्ये त्यांचे शहाणपण दर्शवू शकतात’.
दरम्यान व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुम्ही तुमच्या बाल्कनीतून काहीतरी टाकू शकत होता आणि काहीतरी करू शकले असता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रेकॉर्ड करण्याऐवजी त्याला वाचवायला हवे होते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.