Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मित्राच्या तिकिटावर एका रात्रीत बनला करोडपती! जिंकले 25 कोटी, कर्नाटकच्या स्कुटर मेकॅनिकची कहाणी ऐकली का?

कर्नाटकातील एका स्कूटर मेकॅनिकचे नशीब एका रात्रीत चमकले आहे. मंड्याचा रहिवासी अल्ताफने 25 कोटी रुपयांची केरळ तिरुवोनम बंपर लॉटरी जिंकली. त्यांनी सांगितले की, तो अनेक वर्षे लॉटरीची तिकिटे खरेदी करत होता. मात्र मित्राला देत असलेल्या तिकिटाने त्याला एका रात्रीत करोडपती बनवले. ही घटना सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 11, 2024 | 11:46 AM
मित्राच्या तिकिटावर एका रात्रीत बनला करोडपती, जिंकला 25 कोटींचा जॅकपॉट, कर्नाटकच्या स्कुटर मेकॅनिकची कहाणी ऐकली का?

मित्राच्या तिकिटावर एका रात्रीत बनला करोडपती, जिंकला 25 कोटींचा जॅकपॉट, कर्नाटकच्या स्कुटर मेकॅनिकची कहाणी ऐकली का?

Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटकातील एका स्कूटर मेकॅनिकचे नशीब गुरुवारी चमकले आहे. मंड्याचा रहिवासी मेकॅनिक अल्ताफने एका रात्रीत आपले 25 कोटी रुपयांची केरळ तिरुवोनम बंपर लॉटरी जिंकली. सध्या ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका सामान्य व्यक्तीचे असे रातोरात करोडपती होणे काही साधी बाब नाही. अल्ताफने ही लॉटरी काही मिळवली ते या लेखातून जाणून घेऊयात.

अल्ताफने सांगितले की, “मी सुमारे 15 वर्षांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत होतो. “शेवटी मी जिंकलो.” त्याच्या लॉटरीच्या तिकिटाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी तो सध्या वायनाडमध्ये आहे. त्याचे म्हणणे आहे की, तो त्याच्या बालपणीच्या मित्राला भेटण्यासाठी वायनाडला येतो. लॉटरी विजेता अल्ताफ म्हणाला, “जेव्हा मी वायनाडला माझ्या मित्राला भेटायला यायचे, तेव्हा मी लॉटरीची तिकिटे खरेदी करायचो.”

हेदेखील वाचा – Viral Video: बाइकवर फिरताना अचानक समोर आला भयावह प्राणी, तरुणांचा उडाला थरकाप, पाहूनच अंगावर काटा येईल

टॅक्स कापून हाथी आले 13 करोड रुपये

तिरुअनंतपुरममधील गॉर्की भवन येथे बुधवारी (9 ऑक्टोबर) झालेल्या ड्रॉमध्ये TG 43422 चा विजेता क्रमांक निवडला गेला, ज्याची विक्री वायनाड येथील पनारामम येथील SJ लकी सेंटरने केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या लॉटरीच्या तिकिटातील बंपर बक्षीस राज्याबाहेरील व्यक्तीने जिंकले होते. तमिळनाडूतील तिरुपूर येथील चार संयुक्त विजेत्यांना हा पुरस्कार देण्यात आला. लॉटरी विजेत्याने सांगितले की जिंकल्यानंतर, सर्व कर वजा करून सुमारे 13 कोटी रुपये त्यांना देण्यात आले.

स्वप्न झाले पूर्ण

अल्ताफने सांगितले की, त्याला 18 वर्षांची मुलगी आहे आणि तिला डॉक्टर बनायचे आहे. जेव्हापासून अल्ताफचा लॉटरी जिंकली तेव्हापासून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या पैशाच्या मदतीने तो आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे अल्ताफने सांगितले. अल्ताफ सध्या भाड्याच्या घरात राहतो आणि आता त्याला त्याच्या कुटुंबासाठी स्वतःचे घर विकत घेऊन त्याचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

हेदेखील वाचा – करोडोंची कार चालवत मारत होता श्रीमंतीच्या गप्पा तेवढ्यात गेला तोल, गाडीचा चक्काचूर अन् थरकाप उडवणारा Video Viral

कशी जिंकली लॉटरी?

लॉटरी विजेत्या अल्ताफने सांगितले की, जेव्हा लॉटरीची तिकिटे जाहीर झाली तेव्हा त्याने त्याच्या एका मित्राला प्रत्येकी 500 रुपयांची दोन तिकिटे खरेदी करण्यास सांगितले, परंतु अल्ताफ त्याच्या मित्राला एक तिकीट देणार होता. मात्र त्याच्या पत्नीने त्याला असे करण्यास नकार दिला आणि आज त्याच तिकिटाने त्याला रातोरात करोडपती बनवले आहे.

Web Title: Karnataka men wins 25 crore lottery bike mechanic buying tickets from 15 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 11:45 AM

Topics:  

  • Karnataka

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.