Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटकच्या या मंदिरात रंगांनी नाही तर राखेने खेळली जाते होळी, कामदेव आणि शंकराशी जोडला आहे इतिहास

दक्षिण भारतात होळी ही शिव आणि कामदेव यांच्या पौराणिक कथेशी जोडलेली आहे. कर्नाटकातील रामलिंगेश्वर कामन्ना मंदिरात हा उत्सव अहंकार दहनाचा संदेश देत पाच दिवस विशेष विधींनी साजरा केला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 03, 2026 | 08:55 AM
कर्नाटकच्या या मंदिरात रंगांनी नाही तर राखेने खेळली जाते होळी, कामदेव आणि शंकराशी जोडला आहे इतिहास

कर्नाटकच्या या मंदिरात रंगांनी नाही तर राखेने खेळली जाते होळी, कामदेव आणि शंकराशी जोडला आहे इतिहास

Follow Us
Close
Follow Us:
  • दक्षिण भारतात होळी शिव-कामदेव कथेशी संबंधित असून अहंकार दहनाचा संदेश देते.
  • कर्नाटकातील रामलिंगेश्वर कामन्ना मंदिरात शिव आणि कामदेव यांचे एकत्र दर्शन विशेष मानले जाते.
  • येथे होळी पाच दिवस साजरी होते आणि संतानप्राप्तीसाठी चांदीचा पालना अर्पण करण्याची परंपरा आहे.

भारत हा सणांचा देश आहे आणि प्रत्येक सणामागे एखादी गहन पौराणिक कथा दडलेली असते. उत्तर भारतात होळीचा संबंध भक्त प्रह्लाद आणि होलिका दहनाशी जोडला जातो; मात्र दक्षिण भारतात या सणाचा आशय आणि परंपरा वेगळ्या स्वरूपात आढळतात. येथे होळी ही केवळ रंगांची उधळण नसून भगवान शिव आणि कामदेव यांच्या कथेशी निगडित आध्यात्मिक संदेश देणारा उत्सव मानला जातो. ४ मार्च रोजी देशभर होळी साजरी होणार असली, तरी कर्नाटकातील रामलिंगेश्वर कामन्ना मंदिरात या सणाची अनोखी छटा पाहायला मिळते.

ये जवानी है दिवाणी सारखी होळी खेळायची आहे? मग भारतातील हे लोकेशन्स तुमच्यासाठी परफेक्ट, इथे पूर्ण होईल फिल्मी रंगपंचमीची इच्छा

दक्षिण भारतातील होळी: अहंकार दहनाचा संदेश

उत्तर भारतात होळी प्रामुख्याने दुष्टावर सज्जनाच्या विजयाचे प्रतीक मानली जाते. परंतु दक्षिण भारतात ती कामदेवाच्या दहनाशी आणि शिवांच्या वैराग्याशी जोडलेली आहे. येथे असा विश्वास आहे की या दिवशी मनातील काम, क्रोध आणि अहंकार यांचे दहन करण्याचा संकल्प केला जातो. कर्नाटकातील रामलिंगेश्वर कामन्ना मंदिरात या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे गर्भगृह. भारतात कदाचित हे एकमेव मंदिर असेल जिथे भगवान शिव आणि कामदेव यांच्या प्रतिमा एकत्र पाहायला मिळतात. सामान्यतः शिवमंदिरात शिवलिंग किंवा शिव-पार्वतीची मूर्ती असते; परंतु येथे शिव आणि कामदेव यांचे एकत्र दर्शन हा एक अद्वितीय अनुभव ठरतो. वास्तुकला, नक्षीकाम आणि मंदिराचा इतिहास पाहता, हे ठिकाण पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे.

पौराणिक कथा: शिवांचा तिसरे नेत्र

या परंपरेमागे एक रोचक कथा सांगितली जाते. देवी सतीने यज्ञकुंडात देहत्याग केल्यानंतर भगवान शिव शोकमग्न झाले आणि कठोर तपश्चर्येत लीन झाले. त्यांच्या वैराग्यामुळे सृष्टीचा समतोल बिघडू लागला. देवतांनी शिवांना तपश्चर्येतून जागे करण्यासाठी कामदेवाची मदत मागितली. कामदेवाने आपल्या बाणाने शिवांची समाधी भंग केली. शिवांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी तिसरा नेत्र उघडला. त्या प्रखर ज्वालेत कामदेव भस्म झाला. या घटनेतून अहंकाराचा नाश आणि आत्मसंयमाचा संदेश दिला जातो. दक्षिण भारतातील होळी हा याच प्रसंगाचा स्मरणोत्सव मानला जातो.

पाच दिवसांचा उत्सव आणि विशेष विधी

रामलिंगेश्वर कामन्ना मंदिरात होळी केवळ एक दिवसापुरती मर्यादित नसते. येथे पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आणि पूजाविधी आयोजित केले जातात. मंदिर फुलांनी आणि दिव्यांनी सजवले जाते. मंत्रोच्चार, भक्तिगीते आणि आध्यात्मिक वातावरणामुळे परिसर भारलेला असतो. येथील एक महत्त्वाची परंपरा म्हणजे चांदीचा पालना अर्पण करण्याची. संतानप्राप्तीची इच्छा असलेली दांपत्ये येथे चांदीचा झुला अर्पण करतात. भाविकांचा विश्वास आहे की शिव आणि कामदेव यांच्या कृपेने त्यांची मनोकामना पूर्ण होते. तसेच काही ठिकाणी होळीच्या दिवशी राख कपाळावर लावण्याची प्रथा आहे, जी अहंकार दहनाचे प्रतीक मानली जाते.

पॅरीस, मालदीव नाही तर हनिमूनसाठी हे डेस्टिनेशन्स ठरतायंत खास, निसर्गाच्या सानिध्यात घेता येतो रोमँटिक वातावरणाचा अनुभव

आध्यात्मिक अनुभव देणारी यात्रा

ही यात्रा केवळ पर्यटनासाठी नसून अंतर्मुख होण्याची संधी देणारी आहे. होळीचा खरा अर्थ म्हणजे आपल्या दोषांचे दहन आणि आत्मचिंतन. कर्नाटकातील हे मंदिर शांतता, भक्ती आणि परंपरा यांचा सुंदर संगम दर्शवते. यंदाच्या होळीत काहीतरी वेगळे अनुभवायचे असल्यास दक्षिण भारतातील या विशेष परंपरेचा साक्षीदार होणे एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. येथे मिळणारा आध्यात्मिक संदेश जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देऊन जातो.

Web Title: Ramalingeshwara kamanna temple is the only temple where holi is played with ashes travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • holi
  • holi 2026
  • Karnataka

संबंधित बातम्या

एक अनोखे मंदिर जिथल्या दगडांमधून ऐकायला येत मधुर संगीत, विज्ञानालाही घातलंय याने कोड…
1

एक अनोखे मंदिर जिथल्या दगडांमधून ऐकायला येत मधुर संगीत, विज्ञानालाही घातलंय याने कोड…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.