Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

Snake Viral Video : साप स्वत:च्या प्रतिबिंबाला पाहून घाबरला. आरशात प्रतिबिंब पाहताच केला विषारी हल्ला अन् मग काय घडलं ते तुम्हीच पाहा. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 11, 2026 | 09:42 AM
आरशात स्वत:ला बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

आरशात स्वत:ला बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:
  • आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहून साप गोंधळला.
  • प्रतिबिंबाला दुसरा साप समजून हल्ला केला.
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल.
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे बऱ्याचदा प्राण्यांचेही दृष्य शेअर केले जातात जे पाहणे मनोरंजक ठरते. अलिकडे किंग कोब्रासोबत घडलेली मजेदार घटना इंटरनेटवर शेअर करण्यात आली आहे ज्यातील दृष्ये पाहून यूजर्सना हसू अनावर झालं. साप हा जंगलातील शिकारी असून आपल्या विषारी दंशाने तो अनेक मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करतो. त्याचा हा दंश माणसांसाठीही घातक ठरतो. अशात सापाने विचार करा जर स्वत: स्वत:वर हल्ला केला तर काय होईल…

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

आरशात पाहिले प्रतिबिंब

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका सापाला पेटीत डांबून ठेवल्याचे दिसते. यात एक लहान साप शांतपणे बसलेला असतो आणि याचवेळी एक व्यक्ती त्याच्यासमोर आरसा आणून ठेवतो. सापासमोर हा आरसा ठेवताच साप हे नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याकडे पाहतो आणि त्यातील दृष्ये पाहून तो घाबरतो. खरंतर आरशात सापाला स्वत:चे प्रतिबिंब दिसत असते पण त्याला याची कल्पना नसते की यात दिसणारा प्राणी हा तो स्वत:च आहे.

आरशात स्वत:च्या प्रतिबिंबाला पाहून साप गोंधळात पडतो आणि त्याला वाटते की त्याच्यासमोर आणखी एक दुसरा साप येऊन बसला आहे. या भ्रमातच साप आरशातील स्वत:च्या प्रतिबिंबावर अचानक हल्ला करतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओत साप आरशावर विषारी हल्ला करताना दिसतो. यानंतरही जेव्हा प्रतिबिंबावर त्याचा काही परिणाम झाल्याचे दिसत नाही तेव्हा आपल्या दातांनी तो आरशावर हल्ला करतो. समोर दिसणाऱ्या सापाला मारुन टाकण्याचा त्याचा उद्देश असतो पण तो साप म्हणजे त्याचेच प्रतिबिंब आहे हे शेवटपर्यंत त्याच्या ध्यानात येत नाही.

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

तज्ञांच्या मते, चिंपांझी किंवा डॉल्फिनप्रमाणे सापांमध्ये आरशात स्वतःला ओळखण्याची क्षमता नसते. साप आपल्या आजूबाजूच्या गोष्टी ओळखण्यासाठी दृष्टीपेक्षा वासाची जास्त मदत घेतो. आरशातील प्रतिबिंबाचा वास तर त्यांना येत नाही पण यातील दृष्ये पाहून त्यांना ते आपला शत्रू मानतात आणि स्वत:च्या बचावासाठी त्यांच्यावर हल्ला करतात. दरम्यान हा व्हिडिओ @wildlife.clash नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांना कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “AI असो वा नसो, तो साप मला ‘डायनासोर’ (Dinosaurs) मालिकेतील आजी झिल्डाची आठवण करून देतो”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे व्वा, हा तर खूपच आक्रमक साप आहे; याला स्वतःचे प्रतिबिंबही आवडत नाही!”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मी असा साप आजवर कधीच पाहिला नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: King cobra attacks its own reflection in mirror viral video social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • Cobra Snake
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
1

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
2

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
3

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
4

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.