लेडी-डॉक्टर ऐटीत बसलेली अन् बाप्पाच्या हातात फासावर लटकवलेला आरोपी, कोलकाता प्रकरणासंबंधीचा गणेश मंडळाचा देखावा Viral
सध्या गणेशोत्सवाची धुरा सर्वत्र पसरलेली आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे आणि प्रसन्नाचे वातावरण आहे. या निमित्त सोशल मीडियावर बाप्पाचे अनेक व्हिडिओ शेअर केले जातात आणि हे व्हिडिओ व्हायरलदेखील होतात. यात बऱ्याचदा बाप्पाच्या देखाव्याचे विडिओदेखी पोस्ट केले जातात. सध्या अशाच एका अद्भुत देखाव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात बाप्पाच्या साथीने मागे घडलेल्या कोलकाता प्रकरणाची अनोखी झलक दाखवण्यात आली आहे.
कोलकाता डॉक्टर बलात्कार खून प्रकरणातील आरोपीच्या फाशीच्या मागणीसाठी हा देखावा साकारण्यात आला आहे. हैदराबादमधील ओसमानगंज मार्केट परिसरातील गणेश मंडळाने हा देखावा फार सुंदर रित्या तयार केला आहे. हा देखावा पाहून आता अनेकांच्या अंगावर काटा आला आहे तसेच प्रत्येक जण आता आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा होऊन पीडितेला न्याय मिळावा ही अपेक्षा करत आहेत.
हेदेखील वाचा – आर्याला घराबाहेर काढले तर शो’ला जय महाराष्ट्र! बिग बॉसवर भडकले प्रेक्षक, कमेंट्सचा भडीमार, रितेश देशमुख होतोय ट्रोल
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गणपती बाप्पाची एक भलीमोठी मूर्ती उभी आहे. या मूर्तीच्या हातावर माता पार्वती बसलेली दाखवण्यात आली आहे, तर याच हाथात बापाने एक दोरखंड पकडलेला दिसून येत आहे. हा फाशीचा दोर असून याला बलात्कार प्रकरणातील आरोपीला लटकवल्याचे दाखवण्यात आले आहे. तर खाली डॉक्टर तरुणीचा ऐटीत बसलेला पुतळा बसवण्यात आला आहे. तिच्या बाजूला गणपतीच्या काही लहान मुर्त्यादेखील आहेत. यातून कोलकाता डॉक्टर बलात्कार खून प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, ही मागणी करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – जिथे तू तिथे मी! बापाच्या मूर्तीसमोर हाथ जोडणाऱ्या मूषकाचा गोड Video Viral, पाहून नेटकरी सुखावले
गणपती देखाव्याचा हा व्हायरल व्हिडिओ @south_indian_festivals नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, आरजी कार मेडिकल कॉलेज घटनेची संकल्पना, गणेश मंडप 2024, अद्वितीय गणेश मूर्ती असे लिहिण्यात आले आहे. हा देखावा पाहून आता अनेकजण थक्क झाले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आतापर्यंतचा सर्वोत्तम गणपती देखावा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्वा…बाप्पा ऐकतोय न्याय मिळेल”. दरम्यान या कोलकाता बलात्कार प्रकरणी न्यायाचं साकडं घालणारा हा देखावा आता लोकांना फारच आवडल्याचे दिसून येत आहे.