सध्या बिग बॉस मराठीचे पाचवे सीजन फार चर्चेत आहे. जुलै महिन्याच्या शेवटाला या सीजनचे प्रक्षेपण सुरु झाले. दरम्यान आम्ही तुम्हाला सांगतो की, बिग बॉस हा एक रिअॅलिटी शो आहे. यातील स्पर्धकांची जुगलबंदी प्रेक्षक फार आवडीने पाहत असतात. जसजसा सीजन पुढे जातो तसतशा प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि आतुरता आणखीन वाढू लागतात. बिग बॉसच्या या नवीन सिजनचे सूत्रसंचालनाची धुरा रितेश देशमुखकडे देण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे बिग बॉस मराठीच्या या सीजनचेही अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रेक्षक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर कमेंट्स करत सीजनविषयीचे आपले मत व्यक्त करत असतात. प्रत्येक दिवसातील स्पर्धकांच्या खेळावर प्रेक्षक आपले मत व्यक्त करत असतात. आता या आठवड्यातील सर्वात चर्चेची बाब म्हणजे आर्य निक्कीचे भांडण या भांडणात आर्याने बिग बॉसच्या मूलभूत नियमाचे उल्लंघन करत निक्कीच्या कानशिलात लगावली. मग काय घरातच नाही तर घराबाहेरही याबाबत चर्चा होऊ लागली.
हेदेखील वाचा – जिथे तू तिथे मी! बापाच्या मूर्तीसमोर हाथ जोडणाऱ्या मूषकाचा गोड Video Viral, पाहून नेटकरी सुखावले
आर्याच्या या कृत्यांनंतर आर्याला घराबाहेर काढणार की तिला दुसरी शिक्षा देण्यात येणार आहे, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत या सर्व प्रश्नांचे उत्तर आज शनिवारी होणाऱ्या भाऊंच्या धक्क्यावर सर्वांना मिळणार असल्याचे बिग बॉसकडून सांगण्यात आले होते. त्यांनतर आता भाऊंच्या धक्क्यावर नक्की होणार यासंबंधीचा एक प्रोमो नुक्ताच लाँच करण्यात आला. हा प्रोमो पहिल्यांनंतर आता प्रेक्षक बिग बॉस आणि रितेश देशमुखवर फार भडकले आहेत. एवढेच काय तर, यानंतर आता बिग बॉस आणि रितेशला मोठ्या प्रमाणात ट्रॉलदेखील केले जात आहे.
हे संतापलेले प्रेक्षक आता सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोवर वेगवगेळे कमेंट्स करत आर्याचे समर्थन करत आहेत. एवढेच काय तर आर्याला बाहेर काढल्यास आम्ही हा शो पाहणे बंद करू आणि हा शो स्क्रिप्टेड असल्याचे समजू अशा कठोर शंब्दात आता प्रेक्षक बिग बॉसवर टीका करत आहेत. चला तर यातील काही व्हायरल कमेंट्सचा आढावा घेऊयात.
हेदेखील वाचा – पाकिस्तानने पुन्हा काढली लाज! ब्लिंकिटवर कमेंट करणं पडलं भारी, मिळाला असा रिप्लाय… वाचून हसू अनावर होईल
“कोणा कोणाला वाटते बिगबॉस निक्की च्या पायाखालचे पायपुसणे आहे”
“अक्खा महाराष्ट्र आर्या सोबत आहे…. ती बाहेर आली तर TRP वर परिणाम होईल 100%”
“जर आर्या बाहेर निघाली तर कोनिही बिग बॉस बघनार नाही”
“आर्या ला बाहेर काढले तर इथून पुढे आम्ही बिग बॉस मराठी शो बघणार नाही”
“जे केलं ते 100% बरोबर च केलं, कोणीतरी निक्की च थोबाड फोडण गरजेचं होत. अख्खा महाराष्ट्र आर्या सोबत आहे”
“आर्या बाहेर आली तर बिगबॉस बंद”
“अरबाज आणि निक्किला कॅप्टन पद भेटणार नाही म्हणूनच बिग बॉस ने हे टास्क रद्द केले असे कोणा कोणास वाटते त्यांनी लाईक करा”