सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वारे वाहू लागले आहेत. देशभरात गणेशोत्सव फार थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशाच्या आगमनाने सगळीकडे पवित्र वातावरण निर्माण झाले आहे. गणेशासोबत त्याचे वाहन म्हणून नेहमी त्याच्यासोबत असणाऱ्या मूषकाचेदेखील स्वागत केले जाते. या उत्सवादरम्यान अनेकदा सोशल मीडियावर गणेशाचे नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. सध्या बाप्पासमोर हाथ जोडणाऱ्या मूषकाचा गोड व्हिडिओ फार वेगाने व्हायरल होत आहे.
गणेशोत्सवादरम्यान सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, आताही असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये खराखुरा मूषक बाप्पासमोर येऊन त्याच्या रुपाकडे आहेत त्याच्यासमोर हाथ जोडताना दिसून येत आहे. मिरा-भाईंदर येथील गणेश पंडालमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. याचा व्हायरल व्हिडिओ पाहून आता अनेकजण सुखावले आहेत.
हेदेखील वाचा – पाकिस्तानने पुन्हा काढली लाज! ब्लिंकिटवर कमेंट करणं पडलं भारी, मिळाला असा रिप्लाय… वाचून हसू अनावर होईल
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसते की, गणपतीचे वाहन असलेला मूषक गणपती बाप्पाची मूर्ती बसवलेल्या स्टेजच्या खाली उभा राहून बाप्पाच्या रुपाकडे बघतो आणि हात जोडून बाप्पासमोर प्रार्थना करत राहतो. बाप्पाला अर्पण केलेला प्रसाद घेण्याआधी मूषकाचा प्रार्थना करतानाचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर हळूच बाप्पाचा आवडता प्रसाद मोदक तोंडात घेऊन उंदीर मामाने तिथून पळ काढल्याचे दुसऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
हेदेखील वाचा – स्वतः 11 हजार कमवतेय अन् नवरा हवा 2.5 लाख कमावणारा! घटस्फोटित महिलेचा बायोडेटा Viral, युजर्स म्हणाले…
हा व्हायरल व्हिडिओ @sai_samarpan_cha_raja नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, उंदीर बाप्पाची प्रार्थना करत आहे, असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला 20 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अंगावर काटा आला यार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जिथे गणपती बाप्पा तिथे त्याचा वाहन मुषक”.