अजगराच्या मागे लागली मुंगूसाची पिल्लं, विषारी राक्षसाला चावून-चावून खाल्लं! पाहूनच अंगावर येईल काटा; थरारक Video Viral
सोशल मीडियावर आजवर अनेक प्राण्यांचे व्हिडिओज शेअर झाले आहेत. यात अधिकतर त्यांच्यातील थरारक शिकारीचे दृश्ये दिसते. हे असे व्हिडिओज युजर्सला मात्र खूप मनोरंजक वाटतात. प्राण्यांमध्ये आपल्या जीवासाठी सुरु असलेली ही लढत लोकांना पाहायला फार आवडते ज्यामुळे हे असे व्हिडिओ फार कमी वेळेत सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात कोणत्या प्राण्याने नाही तर मुंगूसाच्या पिल्लांनी एका भल्यामोठ्या अजगराला फाडून खाल्ल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अजगर आणि मुंगूस यांच्यातील एक रंजक संघर्ष दाखवण्यात आला आहे. एका झाडाखाली अजगर विश्रांती घेत असताना मुंगूसांचा एक गट त्याला रडारवर आणत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर मुंगूस आपल्या मेंदूचा वापर करून अजगराला घेरतो आणि हल्ला करू लागतो. मुंगूसांची धूर्तता पाहून हे स्पष्ट होते की त्यांनी मिळून अजगरावर हल्ला करण्याची योजना आखली होती. वन्य प्राण्यांशी संबंधित हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुंगूसाच्या पिल्लांच्या एक गट एकत्र येऊन अजगराला झाडाखाली धरून बसल्याचे दिसत होते. अजगराने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण अचानक झालेल्या मुंगूसच्या हल्ल्याने त्याला पूर्णपणे घेरले. अजगर आपल्या लांब आणि ताकदवान शरीराने हल्लेखोरांना दूर करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मुंगूस त्याच्यावर चारही बाजूंनी हल्ला करत राहतो. अजगराने सर्व शक्ती वापरून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण हे मुंगूस इतके हुशार असतात की ते त्याला तिथून जाण्याची एक संधीही देत नाही आणि त्याला चावून चावून खाऊ लागतात. मुंगूसाच्या पिल्लांच्या या हल्ल्यापुढे अजगरही हैराण होतो. हे दृश्य खूप भितीदायक आणि रोमांचक होते, कारण अजगराची ताकद आणि मुंगूसचे सामूहिक प्रयत्न एकत्र दिसत होते. भल्याभल्या मोठ्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या अजगराची अशी ही दयनीय अवस्था पाहून आता सोशल मीडिया युजर्स आवाक् होत आहेत.
A python made a mistake of trying to snatch a mongoose. pic.twitter.com/8n4evQFSV3
— Kgoshi Ya Lebowa (@Mothematiks) September 29, 2023
अजगराच्या या भयानक शिकारीचा व्हिडिओ @Mothematiks नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अनपेक्षित नेहमी घडते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जगण्यासाठी हल्ला केव्हा करायचा आणि कधी नाही हे शिकण्याबद्दल आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.