(फोटो सौजन्य: instagram)
सोशल मीडियावर अनेक घटना व्हायरल होत असतात. सध्या इथे भारताच्या माजी कर्णधाराचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. 2024 टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या कारचा मंगळवारी संध्याकाळी किरकोळ अपघात घडून आला. हा अपघात बेंगळुरूच्या चालू रस्त्यावर घडला. त्याच्या कारला मालवाहक ऑटोने धडक दिली. या घटनेनंतर राहुल भडकला आणि त्याने ऑटोचालकासोबत रस्त्यावर वाद घालण्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता तो वेगाने व्हायरल होत आहे. नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
आम्ही तुम्हाला सांगतो, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, ही घटना मंगळवार, 4 फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास शहरातील कनिंगहॅम रोडवर घडली. सामान घेऊन जाणाऱ्या ऑटोने माजी भारतीय क्रिकेटपटूच्या कारला मागून धडक दिली. टक्कर झाल्यानंतर राहुल द्रविड कारमधून बाहेर आला. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये द्रविड ऑटोचालकासोबत वाद घालताना दिसत आहे.
काय दिसते व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट पाहिले तर यात दिसते की, कारची धडक होताच द्रविड खाली उतरला आणि त्याच्या कारकडे पाहू लागला. इतक्यात ऑटोचालकही आला. द्रविड त्याला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होता. दोघांमध्ये जोरदार वादावादीही झाली. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मालवाहक ऑटो चालक यांच्यात यांनतर बाचाबाची सुरु झाली. मात्र, हे प्रकरण पोलिसांत नोंद करण्याइतपत मोठे नव्हते. त्यामुळे कोणत्याही पक्षाने तक्रार दाखल केली नाही. टक्कर फारशी जोरदार नव्हती हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान अनेकजण आता सोशल मीडियावर राहुलच्या या प्रकारावर आता आश्चर्य व्यक्त करत आहेत. लहान अपघातासाठी भररस्त्यात भांडणे अनेकांना चुकीचे वाटले असून कमेंट्स करत युजर्सने या प्रकारावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “राहुल भाऊ देखील क्रेटा चालवतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आह, “इंदिरानगरचा गुंडा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “साधा माणूस, साधी कार”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.