Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तळघर साफ करताना मालकाला सापडली ‘रहस्यमयी’ पेंटिंग’, सत्य समोर येताच क्षणार्धात बनला मालामाल

एका अज्ञात ठिकाणी गेल्यावर आपल्याला त्या ठिकाणाविषयी सहाजिक फार काही माहिती नसते मात्र जसजसे आपण त्या जागेला एक्सप्लोर करू लागतो तसतसे तिथले अनेक रहस्य बाहेर येऊ लागतात. अशीच काहीशी घटना एका इटालियन महिलेसोबत घडली आहे. घराच्या तळघराची साफसफाई करत असताना महिलेला एक रहस्यमयी पेंटिंग सापडली. ही पेंटिंग काही सामान्य पेंटिंग नसून यात अनेक गूढ दडलेले होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 04, 2024 | 10:58 AM
तळघर साफ करताना मालकाला सापडली 'रहस्यमयी' पेंटिंग', सत्य समोर येताच क्षणार्धात बनला मालामाल

तळघर साफ करताना मालकाला सापडली 'रहस्यमयी' पेंटिंग', सत्य समोर येताच क्षणार्धात बनला मालामाल

Follow Us
Close
Follow Us:

अनेक वेळा असे घडते की आपण जिथे राहतो त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती आपल्याला नसते. अशा स्थितीत येथे काही विचित्र दिसले की धक्का बसणे स्वाभाविक आहे. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेबाबत ऐकून आता अनेकांना आश्चर्यचाच धक्का बसला आहे. घर साफ करणाऱ्या एका महिलेसोबतही एक धक्कादायक प्रकार घडून आला. या प्रकाराने आता सोशल मीडियावर धुमाकूळ माजवली आहे.

घडले असे की, घराच्या तळघरात पोहचताच महिलेला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एका इटालियन महिलेला तिच्या घराच्या तळघरात साफसफाई करताना काही विचित्र पेंटिंग्ज सापडल्या. ते अतिशय स्वस्त फ्रेममध्ये बसवलेले होते आणि ते खूपच भयानक दिसत होते. महिलेला जिवंत असताना त्याचे सत्य कळू शकले नाही, परंतु तिच्या मृत्यूनंतर त्याचे संपूर्ण वास्तव समोर आले.

हेदेखील वाचा – धक्कादायक! चिमुकलीच्या अंगावर पडला भलामोठा फ्रिज, अंगावर काटा आणणारा Video Viral

तळघरात मिळाली रहस्यमयी पेंटिंग

ही घटना 1962 सालची आहे. इटलीतील कॅप्री येथे राहणाऱ्या लुइगी लो रोसो यांना त्यांच्या घराच्या तळघरात वर्तुळात गुंडाळलेले एक विचित्र चित्र सापडले. हे पेंटिंग त्यांनी एका स्वस्त फ्रेममध्ये लावून आपल्या दिवाणखान्याच्या भिंतीवर टांगले. हे चित्र अनेक दशके तिथे लटकले पण रोसोच्या पत्नीला ते अजिबात आवडले नाही. एके दिवशी लुइगीचा मुलगा अँड्रिया कलेच्या इतिहासाबद्दल वाचत होता आणि त्याला पेंटिंगवरील स्वाक्षरी दिसली.

हेदेखील वाचा – हवेत अजगराने रचला मृत्यूचा सापळा, कावळ्याचं डोकं पकडून अशी केली शिकार पाहून तुम्हीही व्हाल हैराण, Viral Video

मालकाच्या मृत्यूनंतर सत्य आले समोर

ॲड्रियाला शंका होती की, ही पेंटिंग सामान्य नसून यात काहीतरी विशेष आहे. अशा परिस्थितीत तिने स्थानिक तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सुरुवात केली. अनेक महिन्यांच्या तपासानंतर, सिंझिया अल्टीएरी नावाच्या ॲक्रेडिया फाऊंडेशनच्या सदस्याने पुष्टी केली की पेंटिंगवरील स्वाक्षरी इतर कोणीही नसून प्रसिद्ध स्पॅनिश कलाकार पाब्लो पिकासोची होती.

घराच्या मालकाच्या मृत्यूनंतर, त्यांचा मुलगा अँड्रियाला हे सत्य समजले की ही एक सामान्य नाही तर अमूल्य पेंटिंग आहे, जी 1930 ते 1936 दरम्यान बनविली गेली होती. आजच्या काळात या पेंटिंगची किंमत सुमारे 5 मिलियन पौंड म्हणजेच 55,71,31,188 रुपये आहे. त्यात चित्रित केलेली स्त्री ही फ्रेंच फोटोग्राफर आणि पेंटर डोरा मार आहे, जीही स्त्री 1945 पर्यंत पिकासोची गर्लफ्रेंड होती.

Web Title: Off beat mysterious painting found in secret room turned out worth 55 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 10:57 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.