सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ तर इतके धक्कादायक असतात की त्यांना पाहून आपल्या अंगावर काटा येतो. सध्या असाच एक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसून येत आहे. यात एका चिमुकलीच्या अंगावर भलामोठा फ्रिज पडल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओतील थरारक घटना पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. दरम्यान घराबाहेर पडल्यावर लहान मुलांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे नाहीतर अशा घटना घडू शकतात.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एका स्टोरमधील आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरवातीला एक मुलगा फ्रिजवळ उभा असल्याचे दिसून येईल. तो फ्रिज उघडतो आणि काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो तितक्यात तिथे एक चिमुकली मुलगी येते आणि ती देखील फ्रीजचा दुसरा दरवाजा उघडू लागते. फ्रिजचा दरवाजा उघडल्यानंतरही ती दरवाज्याला स्वत:कडे ओढण्याचा प्रयत्न करते. पुढे तिच्या अंगावर भला मोठा फ्रिज पडतो. हा सर्व थरार पाहत असताना तुम्हाला निश्चितच अचंबित व्हायला होईल.
हेदेखील वाचा – हवेत अजगराने रचला मृत्यूचा सापळा, कावळ्याचं डोकं पकडून अशी केली शिकार पाहून तुम्हीही व्हाल हैराण, Viral Video
फ्रिज मुलीवर पडल्याचे समजताच बाजूला उभा असलेला मुलगा ,मदतीसाठी जोरजोरात ओरडू लागतो. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनस्थळी येतात आणि मुलीच्या अंगावर पडलेला फ्रिज उचलतात. सुदैवाने बाजूला उभा असलेल्या मुलाला कोणतीही दुखापत होत नाही. त्यानंतर हा व्हिडीओ येथेच संपतो. मुलीची स्थिती कशी आहे याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ही सर्व घटना स्टोरमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून आता याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण आता हा व्हिडिओ पाहून थक्क झाले आहेत.
— Dead Guy Hub (@deadguyhub) October 2, 2024
हेदेखील वाचा – शिक्षक आहे की हैवान? विद्यार्थ्याला खेचत भिंतीवर आपटलं डोकं, Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का
हा व्हायरल व्हिडिओ @deadguyhub नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की ती ठीक असेल. नशीब चांगले की फ्रिजचे दरवाजे उघडे होते.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जेव्हा मोठे आजुबाजूला नसतात तेव्हा लहान मुले असे वागतात”.