अजगर विषारी असू शकत नाही, परंतु तो खूप शक्तिशाली आहे. अशा परिस्थितीत कोणताही प्राणी त्याच्या तावडीत अडकला तर त्याचे जगणे फार कठीण होऊन बसते. अजगराचे अनेक व्हिडिओ याआधी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र सध्या याचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून तुमच्या पायाखालची जमीन हादरेल. तुम्ही याआधी अजगराला जमिनीवर शिकार करताना पाहिले मात्र अजगराने हवेत शिकार केल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? नसेल तर आजच्या या व्हायरल व्हिडिओतून तुम्हाला हा थरार पाहता येणार आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, अजगराने खांबाला लटकलेल्या कावळ्याला पकडून आपले शिकार बनवले आहे. कावळा त्रास सहन करत राहिला, पण अजगराने त्याला कोणत्याही किंमतीत सोडले नाही उलटी त्याची पकड आणखीन भक्कम केली आणि हवेतच कावळ्याला आपल्याकडे खेचत राहिला. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. आपल्या शिकारीला मिळवण्यासाठी अजगर कोणत्याही ठरला जाऊ शकतो हे यातून दिसून येते.
हेदेखील वाचा – शिक्षक आहे की हैवान? विद्यार्थ्याला खेचत भिंतीवर आपटलं डोकं, Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का
व्हिडिओमध्ये खांबाला लटकलेला अजगर एका कावळ्याला पकडताना दिसत आहे. अजगर कावळ्याचे डोके तोंडात धरून त्याला वर खेचत आहे. अजगर जसजसा कावळा वर येतो तसतसा अजगर त्याला आपल्या शरीराभोवती गुंडाळून घेतो. अजगर त्याला आपल्या शेपटीने पूर्णपणे गुंडाळून खांबाच्या वरच्या बाजूला घेऊन जातो. जेणेकरुन कावळ्याच्या शरीरातील सर्व हाडे तोडून ते त्याचे अन्न बनवू शकेल. काही सेकंदाचा हा व्हिडिओ तुम्हाला काही क्षणातच अचंबित करून जाईल. हतबल कावळा आणि त्याची शिकार करण्यासाठी आकांताने प्रयत्न करणारा अजगर हा सर्व थरार आता हैराण करणारा ठरत आहे.
Morning vibe pic.twitter.com/oejiGU63lc
— NATURE IS BRUTAL (@TheBrutalNature) September 29, 2024
हेदेखील वाचा – Viral Video: पुण्यात रात्रीच्या सुमारास कार चालकासोबत घडलं असं काही… पाहूनच अचंबित व्हाल
हा व्हायरल व्हिडिओ @TheBrutalNature नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 20 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 20 हजार लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर कमेंट्सदेखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे”, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असे काहीही पाहिले नाही”.