पाकिस्तानने पुन्हा काढली लाज! ब्लिंकिटवर कमेंट करणं पडलं भारी, मिळाला असा रिप्लाय... वाचून हसू अनावर होईल
भारताने काही वर्षांपासून अनेक क्षेत्रात आता प्रगती करायला सुरुवात केली आहे. त्यातच अनेकदा भारताच्या शेजारील देश पाकिस्तान नेहमीच भारतासोबत काही ना काहीं कारणास्तव स्पर्धा करू पाहतो आणि मग तोंडावर आपटला जातो. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सध्या फार बिकट आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये महागाई थांबण्याचे काही नाव घेत नाही आहे.
पाकिस्तान सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेचा विषय बनतो. भारताला उगाचच डिवचने पाकिस्तानचा जाणून छंदच झाला आहे. यावेळीही पाकिस्तानने असे काहीतरी करू पाहिले मात्र या प्रयत्नात तो सपशेल फेल झाला आहे. साध्याच याचीच सर्वत्र चर्चा होत आहे. या घटनेवरून पाकिस्तानने पुन्हा आपली लाज काढल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – स्वतः 11 हजार कमवतेय अन् नवरा हवा 2.5 लाख कमावणारा! घटस्फोटित महिलेचा बायोडेटा Viral, युजर्स म्हणाले…
तर झालं असं की, पाकिस्तानची ई-कॉमर्स कंपनी क्रंबल आणि भारताची ब्लिंकिट यांनी सोशल मीडियावर एकमेकांचे पाय खेचले आहेत. हा संवाद बिस्किटांच्या ऑर्डरने सुरू झाला आणि पाकिस्तान क्रिकेट संघावर संपला. दोन्ही कंपनीतील संभाषण आता व्हायरल झाले असून भारताने पाकिस्तानला दिलेली मजेदार कमेंट वाचून तुम्ही पोट धरून हसाल.
हेदेखील वाचा – कारला ओव्हरटेक करणे पडले महागात, क्षणार्धात बाइकचे तुकडे अन् तरुण… पाहूनच थरकाप उडेल, Video Viral
पाकिस्तानच्या क्रंबल आणि भारताच्या ब्लिंकिटमध्ये एका पोस्टवरून वाद सुरू झाला. पाकिस्तानी कंपनी क्रंबलने ब्लिंकिटच्या पोस्टवर कमेंट करत म्हटले, “तुमची जीभ जितक्या वेगात चालते त्याच वेगात तुमची डिलिव्हरी चालायला हवी होती. यावर, ब्लिंकिटने क्रंबलला पुन्हा प्रत्युत्तर देत म्हटले, “आमची डिलिव्हरी वेगवानच आहे, तुम्ही तुमच्या गोलंदाजांच्या खराब चेंडूच्या डिलिव्हरीकडे लक्ष द्या.”
दरम्यान क्रंबलमी ब्लिंकिटवर केलेली ही पहिले कमेंट नाही याआधीही कंपनीने ब्लिंकिटच्या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. मात्र यावेळी ब्लिंकिटने क्रंबलला सडेतोड उत्तर आता फार व्हायरल होत आहे. हे उत्तर वाचून आता अनेकांना हसू अनावर झाले आहे.