
Pakistani maulana want to marry Indian Actress Aishwarya Rai
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर ऐश्वर्या रायच्या भारतीय चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. राखी सावंत हिच्याबद्दल देखील मौलवीने धक्कादायक वक्तव्य केले आहे. या व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्यातील घटस्फोटांच्या अफवा पसरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मौलाना यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ते ऐश्वर्या रायशी लग्न करण्यास इच्छुक आहे. त्यांनी राखी सावंत हिचा उल्लेखही केला आहे.
मौलवी यांचा हा एका मुलाखतीतील व्हिडिओ असल्याचे लक्षात येते. त्यांनी जेव्हा ऐश्वर्या रायशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा मुलाखतदारेन विचारले की, तुम्ही बिगर मुस्लिमशी लग्न कसे करणार? या प्रश्नावर मौलवींनी म्हटले की, त्यांनी म्हटले की, आधी ऐश्वर्या रायला इस्लाम धर्म स्वीकारयाला लावेल. त्यानंतर तिचे नाव बदलून आयेशी राय असे ठेवेल.
त्यांनी म्हटले की, ऐश्वर्या राय त्यांना एक मेसेज देखील पाठवतील. त्या म्हणतील की माझे इस्लामचे सौंदर्य म्हणजे अल्लाहची देणगी आहे. ऐश्वर्या राय त्यांना एक मेसेज देखील पाठवतील. त्या म्हणतील की माझे इस्लामचे सौंदर्य म्हणजे अल्लाहची देणगी आहे. सध्या पाकिस्तानी मौलवींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने ऐश्वर्या रायच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या पाकिस्तानी मौलवींचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून ऐश्वर्याच्या चाहत्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहे. एका युजरने काहीही, ती तुमच्यासाठी मुस्लिम का होईल? असा प्रश्न केला आहे. तर एकाने मी आत्ताच सलमान भाईला जाऊन सांगतो असे म्हटले आहे, तर तिसऱ्या एकाने धुर्त मौलवी अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या हा व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.